Gang raped in Spa: दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका स्पा सेंटरमध्ये तरुणीवर कथितपणे सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित तरुणी ही २२ वर्षीय आहे. तर स्पा सेंटरचा मॅनेजर आणि एका ग्राहकाने मिळून हे घृणास्पद कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी सुद्धा घेतली असून दिल्ली पोलीस आणि मनपाला एक नोटीस दिली आहे. (Shocking delhi woman gang raped in spa center by manager and customer crime news in marathi)
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. पीडित तरुणीने दिल्ली महिला आयोगाला सांगितले की, पीतमपुरा येथील 'द ओशन स्पा' मध्ये ही घटना घडली. या स्पा सेंटरमध्ये पीडित तरुणी मसाज करण्याचं काम करते. पीडितेनी सांगितले की, स्पा सेंटरच्या मॅनेजरने एका ग्राहकासोबत तिची भेट घडवून दिली. त्यानंतर त्याने तिला एक ड्रिंक दिली. त्या ड्रिंकमध्ये नशेचे पदार्थ मिसळलेले होते. त्यानंतर दोघांनी मिळून सामूहिक बलात्कार केला.
अधिक वाचा : FTII च्या हाॅस्टेलमधून येत होती दुर्गंधी, खिडकीतून बघितलं तर...
सामूहिक बलात्कार केल्यावर पीडित मुलीने आपल्यावर घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्पा सेंटरच्या मालकाने तिला गप्प राहण्यास सांगितले. इतकेच नाही तर गप्प राहण्यासाठी लाच देण्याचाही प्रयत्न केला.
A girl working at a massage parlour in Delhi's Pitampura alleged that she was raped by parlour's manager and a customer on August 5. Police registered a case of gang rape while both the accused has been arrested: Delhi Police — ANI (@ANI) August 6, 2022
या प्रकरणाची माहिती दिल्ली महिला आयोगाला मिळताच त्यांनी तातडीने पावलं उचलली. त्यानंतर दिल्ली पोलिसांसह दिल्ली मनपाला एक नोटीस बजावली आहे. तसेच या प्रकरणी काय कारवाई केली याबाबतचा एक अहवाल मागितला आहे. दिल्ली पोलिसांना पाठवलेल्या नोटीसमध्ये स्वाती मालिवाल यांनी या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींची माहिती आणि एफआयआर कॉपी सुद्धा मागितली आहे.
दिल्ली महिला आयोगाने अधिकाऱ्यांकडे विचारणा केली की, या स्पा सेंटरकडे अधिकृत परवाना आहे का?. वैध परवाना नसतानाही स्पा सेंटर सुरू असल्यावरुन या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी म्हटलं, दिल्लीत स्पाच्या आडून सेक्स रॅकेट चालवले जात आहेत. अनेक घटना अशा घडतात. मात्र, आरोपी या मुलींना धमकावत गप्प राहण्यास सांगतात आणि ब्लॅकमेल करतात.