SSC Scam: पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्या नात्याविषयी जगजाहीर झाली धक्कादायक माहिती

SSC Scam: पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळा उघड झाला आहे. ईडी या प्रकरणात तपास करत आहे. दररोज या प्रकरणात नवी माहिती उजेडात येत आहे. 

shocking disclosure on relationship between partha chatterjee and arpita
SSC Scam: पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्या नात्याविषयी जगजाहीर झाली धक्कादायक माहिती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • SSC Scam: पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्या नात्याविषयी जगजाहीर झाली धक्कादायक माहिती
  • पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत ईडीच्या कोठडीत
  • अर्पिताच्या ३१ जीवन विमा पॉलिसींवर पार्थ नॉमिनी

SSC Scam: पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळा उघड झाला आहे. ईडी या प्रकरणात तपास करत आहे. दररोज या प्रकरणात नवी माहिती उजेडात येत आहे. 

कोर्टाच्या आदेशानुसार पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. या कोठडीची मुदत वाढणार की नाही हे शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीतून स्पष्ट होईल. याआधीच पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्या नात्याविषयी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. 

अर्पिता मुखर्जी हिच्या नावावर ३१ जीवन विमा योजना (लाइफ इन्शुरन्स पॉलिसी) आहेत. या सर्व विमा योजनांमध्ये फक्त पार्थ चटर्जी नॉमिनी अर्थात वारसदार आहे.

ईडीने बुधवार ३ ऑगस्ट २०२२ रोजी पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांनी संयुक्तपणे चालविलेल्या एका कंपनीची माहिती कोर्टाला  दिली. एपीआय युटिलिटी सर्व्हिसेस (APA utility services) नावाची कंपनी पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी संयुक्तपणे चालवत होते. या कंपनीशी संबंधित आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे ईडीने कोर्टापुढे सादर केली. या कागदपत्रांवरून पार्थ आणि अर्पिता यांचे आर्थिक हितसंबंध जुने आहेत आणि त्या व्यवहारांच्या निमित्ताने दोघेही एकमेकांना दीर्घ काळापासून ओळखत असल्याचे सिद्ध होते असे ईडीने कोर्टाला सांगितले. 

ईडीने अर्पिताच्या दोन फ्लॅटमधून कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम आणि सोनं मोठ्या प्रमाणात जप्त केले. पार्थ आणि अर्पिताशी संबंधित अनेक कागदपत्रांची छाननी सुरू आहे. कागदपत्रांमधील उल्लेखांच्याआधारे ईडीने पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी धाडी टाकून कारवाई सुरू केली आहे. अनेक कागदपत्रे जप्त करून त्यांची तपासणी सुरू केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी