Delhi Bomb Scare: धक्कादायक! गाजीपूर फुल मार्केटमध्ये बेवारस बॅगेत सापडली IED स्फोटके; पाहा व्हिडिओ

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 14, 2022 | 23:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Delhi Bomb Scare | दिल्लीतील गाझीपूर फुल मार्केटमध्ये शुक्रवारी सकाळी एक बेवारस बॅग सापडल्यानंतर खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, बॉम्बविरोधी पथक आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तपासात पोलिसांना बॅगेतून आयईडी स्फोटके सापडली.

Shocking IED explosives were found in a bag containing at Ghazipur flower market
गाजीपूर फुल मार्केटमध्ये बेवारस बॅगेत सापडली IED स्फोटके  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दिल्लीतील गाझीपूर फुल मार्केटमध्ये शुक्रवारी सकाळी एक बेवारस बॅग सापडल्यानंतर खळबळ उडाली.
  • तपासात पोलिसांना बॅगेतून आयईडी स्फोटके सापडली.
  • या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने स्फोटक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Delhi Bomb Scare | नवी दिल्ली : दिल्लीतील गाझीपूर फुल मार्केटमध्ये शुक्रवारी सकाळी एक बेवारस बॅग सापडल्यानंतर खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, बॉम्बविरोधी पथक आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तपासात पोलिसांना बॅगेतून आयईडी (IED) स्फोटके सापडली. पोलिसांनी दिल्ली, यासोबतच जम्मू-काश्मीर आणि पंजाबला हादरवण्याचे प्रयत्न हाणून पाडले आहेत. माहितीनुसार, पूर्व दिल्लीतील गाझीपूर फुल मार्केटमध्ये एक बेवारस बॅग सापडल्याने खळबळ उडाली. त्यानंतर सर्वप्रथम पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बॅगच्या आजूबाजूचा परिसर रिकामा केला. सकाळी १०.३० वाजता बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. (Shocking IED explosives were found in a bag containing at Ghazipur flower market). 

स्फोटके असलेला धक्कादायक व्हिडिओ 

घटनेची गंभीरता पाहून राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (National Security Guard) घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर जेसीबी मागवण्यात आला. घटनास्थळी खोल खड्डा खोदून बॉम्ब निकामी केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास आता दिल्ली पोलिसांचे विशेष पथक करत आहे, अशीही माहिती समोर आली आहे. हा स्फोटक किती जड होता, हे बॉम्ब निकामी करताना समोर आलेल्या व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे.

दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यानी म्हटले की तपासानंतर बॅगेत आयईडी स्फोटक बाहेर आली. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने स्फोटक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी