मादी श्वानाला बारा वेळा चाकू मारून मरण्यासाठी समुद्रकिनारी सोडून गेला

Shocking News Man Stabbed Dog 12 Times Then Left It To Die On Beach News From England : इंग्लंडमधून एक धक्कादायक बातमी आली आहे. ल्युक प्रॉफिट (Luke Proffit) नावाच्या २२ वर्षांच्या तरुणाने जर्मन शेपर्ड मादी श्वानाला (कुत्री) बारा वेळा चाकू मारला.

Man Stabbed Dog 12 Times Then Left It To Die On Beach
मादी श्वानाला बारा वेळा चाकू मारून मरण्यासाठी समुद्रकिनारी सोडून गेला 
थोडं पण कामाचं
  • मादी श्वानाला बारा वेळा चाकू मारून मरण्यासाठी समुद्रकिनारी सोडून गेला
  • मादी श्वानाचा मृत्यू
  • मारेकऱ्याला अटक, कोर्टाने ठोठावली १८ महिन्यांची शिक्षा

Shocking News Man Stabbed Dog 12 Times Then Left It To Die On Beach News From England : इंग्लंडमधून एक धक्कादायक बातमी आली आहे. ल्युक प्रॉफिट (Luke Proffit) नावाच्या २२ वर्षांच्या तरुणाने जर्मन शेपर्ड मादी श्वानाला (कुत्री) बारा वेळा चाकू मारला. नंतर ल्युक मादी श्वानाला  हेंडनच्या समुद्रकिनाऱ्यावर मरण्यासाठी सोडून गेला. ही घटना सुंदरलँड (Sunderland) परिसरातील आहे. 

हेंडनच्या समुद्रकिनाऱ्यावर वावरताना एका व्यक्तीने गंभीर जखमी झालेल्या मादी श्वानाला बघितले आणि तातडीने जवळच्या प्राण्यांच्या डॉक्टरकडे नेले. पण डॉक्टरांकडे नेण्याआधीच मादी श्वानाने अखेरचा श्वास घेतला होता. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी हेंडनचा समुद्रकिनारा आणि आसापासच्या भागात जिथे जिथे सीसीटीव्ही कॅमेरे होते त्यांचे फूटेज तपासले. या फूटेजमुळे पोलिसांना ल्युकला शोधून पकडणे सोपे झाले. घटनेनंतर २४ तासांच्या आत ल्युक पोलीस कोठडीत होता. 

कोर्टात ल्युकच्या प्रकरणाची सुनावणी झाली. वकिलाने ल्युकची मानसिक स्थिती बिघडली असल्याचे कोर्टाला सांगितले. ल्युकला काही आवाज ऐकू येतात यानंतर त्याची मानसिक स्थिती बिघडते आणि तो गुन्हे करतो असे वकिलाचे म्हणणे होते. पण कोर्टासमोर आपले म्हणणे ठोस पुराव्यांसह सादर करण्यात ल्युकचे वकील अपयशी ठरले. अखेर कोर्टाने क्रूरपणे प्राणी हत्या केल्याप्रकरणी तसेच प्राण्याचा छळ केल्याप्रकरणी ल्युकला १८ महिन्यांची शिक्षा दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी