Shocking! बास्केटबॉल प्लेअरवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच स्टेडियमच्या छतावरुन ढकललं

Basketball player thrown off roof of Stadium: बास्केटबॉल प्लेअरवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बास्केटबॉल प्लेअरवर बलात्काराचा प्रयत्न
  • विरोध केल्यावर तीन आरोपींनी बास्केटबॉल प्लेअरला स्टेडिअमच्या छतावरुन खाली फेकलं
  • घटनेतील तिन्ही आरोपी फरार

Three people attempt to rape on Basketball player: एक खळबळजनक आणि धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. एका बास्केटबॉल प्लेअरवर तीन तरुणांनी कथितपणे बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित मुलगी ही १८ वर्षीय असून ती एक बास्केटबॉल प्लेअर आहे. पंजाबमधील मोगा जिल्ह्यात ही घटना घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Shocking three youths attempt to rape on basketball player in moga punjab thrown off roof of stadium after she oppose)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना १२ ऑगस्ट रोजी घडली आहे. ज्यावेळी पीडित तरुणीने आरोपींना विरोध केला तेव्हा आरोपींनी तिला स्टेडियमच्या छतावरुन ढकलून दिल्याचंही समोर आलं आहे. मोगा जिल्ह्यात घडलेल्या या घडनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला उपचारासाठी लुधियाना येथील एका खासगी रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. या मुलीच्या दोन्ही पायांना आणि जबड्याला दुखापत झाली आहे. ही घटना १२ ऑगस्ट रोजी घडली आहे. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अधिक वाचा : Dahi Handi: "प्रो कबड्डीप्रमाणे आता प्रो-दहीहंडी स्पर्धा भरवणार" गोविंदांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

पीडित मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, त्यांची मुलगी ही प्रॅक्टिस करण्यासाठी मोगा येथील स्टेडियमवर पोहोचली होती. तेथे जतिन कांडा नावाच्या एका आरोपीने स्टेडियममध्ये तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी माझ्या मुलीने त्याला विरोध केला आणि घटनास्थळावरुन बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने मुलीला २५ फूट उंचावरुन खाली ढकलून दिले.

पीडित मुलगी ही २५ फूट उंचावरुन खाली पडल्याने तिला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपी हे फरार आहेत. मात्र, या आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात येईल आणि त्यासाठी पोलिसांच्या टीम तयार करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी