Sidhu Moose Wala : मूसेवालाला घरात शिरून मारणार होते शूटर, पोलिसांच्या वर्दीत करणार होते खातमा!

Moose Wala Murder Case : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर (Sidhu Moose Wala Murder)एकामागोमाग एक नवनव्या गोष्टी प्रकाशात येत आहेत. पंजाब पोलिसांबरोबरच दिल्ली आणि महाराष्ट्र पोलिसदेखील या प्रकरणाचा छटा लावण्यासाठी कामाला लागली होती. मात्र यात दिल्ली पोलिसांना (Delhi Police) सर्वात आधी यश मिळाले. सोमवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने तीन मारेकऱ्यांना अटक केली.

Sidhu Moose Wala Murder Case
सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरण 
थोडं पण कामाचं
  • सिद्धू मूसेवालाच्या खूनासंदर्भात नवनवीन माहिती रोज समोर येते आहे
  • मूसेवालाची हत्या त्याच्या घरात शिरून करण्याची होती योजना
  • शूटरने त्यासाठी विकत घेतली होती पोलिसांची वर्दी

Sidhu Moose Wala Murder : नवी दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर (Sidhu Moose Wala Murder)एकामागोमाग एक नवनव्या गोष्टी प्रकाशात येत आहेत. पंजाब पोलिसांबरोबरच दिल्ली आणि महाराष्ट्र पोलिसदेखील या प्रकरणाचा छटा लावण्यासाठी कामाला लागली होती. मात्र यात दिल्ली पोलिसांना (Delhi Police) सर्वात आधी यश मिळाले. सोमवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने तीन मारेकऱ्यांना अटक केली. आता एक नवीनच माहिती समोर येते आहे. ती अशी की मारेकऱ्यांना सिध्दू मुसेवालाला त्याच्या घरातच मारायचे होते. यासाठी मारेकऱ्यांनी पोलिसांची वर्दीदेखील विकत घेतली होती. (Shooters wanted to kill Moosewala in his home in police)

अधिक वाचा : प्रारंभी अयोग्य वाटणारे अनेक निर्णय नंतर राष्ट्र उभारणीत लाभदायक – पंतप्रधान मोदी

पोलिसांच्या वर्दीत हल्ल्याची तयारी

सिद्धू मुसेवालाला नेहमी मोठे संरक्षण असायचे. त्यामुळेच कॅनडात बसलेल्या गोल्डी बराडने प्रियव्रतला पोलिसांच्या वर्दीत हल्ला घडवून आणण्याचे सांगितले होते. त्यानुसार त्याचे शूटर या हल्ल्याचे नियोजन करत होते. मात्र तेव्हाच संदीप केकडा याने 29 मे ला सिद्धू मूसेवाला संरक्षणाशिवाय घराबाहेर पडल्याची खबर दिली. 

अधिक वाचा : International Yoga Day 2022 : "योग पार्ट ऑफ लाइफ नाही, वे ऑफ लाइफ बनत आहे', म्हैसूर पॅलेसमधून पंतप्रधान मोदींचा संदेश

पोलिसांना तुरुंगात मिळाले धागेदोरे

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सूत्रांनी माहिती देताना सांगितले की सिद्धू मूसेवालावर गोळ्या झाडणाऱ्या प्रियव्रत फौजीचे धागेदोरे तुरुंगातील एका गुन्हेगाराकडून पोलिसांच्या हाती आले होते. सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर दिल्ली पोलिसांचे पथक सर्व तुरुंगांमध्ये जाऊन कैद्यांची चौकशी करत होती. याच दरम्यान त्यांना तुरुंगातील एक कैद्याने टिप दिली. त्यानुसार कित्येक दिवस माग काढत दिल्ली पोलिसांचे पथक गुजरातमधील मुंद्रा येथे पोचले. 

अधिक वाचा : Yoga Day 2022 : योग आहे भारतीय नेत्यांचा फिटनेस मंत्र, असे ठेवतात स्वतःला फिट अँड फाईन

बिश्नोई आणि बराडची इच्छा होती खूनाची चर्चा व्हावी

कॅनडात असलेला गॅंगस्टर गोल्डी बराड आणि तुरुंगात असलेला लॉरेन्स बिश्नोई यांना सिद्धू मूसेवालाचा खून करायचा होता. मात्र त्याचबरोबर दोघांचीही इच्छा होती की या हत्येची चर्चा सर्वत्र झाली पाहिजे. त्यानुसार 29 मेला सिद्धू मूसेवालाची इच्छा करण्यात आली होती. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येने सर्वांनाच धक्का दिला होता. 

पोलिसांची कारवाई

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवालाच्या हत्येच्या तपासात पोलिसांनी एक मोठा पल्ला पार केला आहे. मूसेवालाच्या हत्येत सहभागी असणाऱ्या शूटर्सच्या मॉड्युल हेडसह दोन मुख्य शूटर्सना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचप्रमाणं मोठ्या संख्येनं शस्त्रास्त्रं आणि स्फोटकंही जप्त केली आहेत. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत सर्वच्या सर्व सहा आरोपींची ओळख पटवण्यात यश मिळालं आहे. याच सहा शूटर्सनी मूसेवालावर गोळीबार केला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रियव्रत उर्फ फौजी याला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. दोन मुख्य शूटर्स आणि त्यांचे इतर तीन साथीदार यांच्याकडून पोलिसांनी 8 ग्रेनेड, 3 पिस्तुल आणि जवळपास 50 काडतुसं जप्त केली आहेत. त्यांच्याकडे इतरही बरीच स्फोटकं सापडली असून हा सर्व साठा पोलिसांनी जप्त केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी