Texas Shooting : धक्कादायक! टेक्सासमधील शाळेत माथेफीरूचा अंधाधुंद गोळीबार; 18 बालकांचा मृत्यू

अमेरिकेतील (America) टेक्सासमधील (Texas ) शाळेत भीषण गोळीबार (Shooting ) झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये 18 मुलांचा तर तीन शिक्षकंचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. टेक्सासमधील उवाल्डे शहरात गोळीबारीची घटना घडली असून हल्लेखोर हा 18 वर्षाचा असून त्याने रॉब एलिमेंटरी स्कूलमधील विद्यार्थ्यांवर अंधाधुंद गोळीबार केला.

shooting at a school in Texas
टेक्सासमधील शाळेत माथेफीरूचा अंधाधुंद गोळीबार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • टेक्सासमधील उवाल्डे शहरात गोळीबारीची घटना घडली.
  • हल्लेखोर हा 18 वर्षाचा असून त्याने रॉब एलिमेंटरी स्कूलमधील विद्यार्थ्यांवर अंधाधुंद गोळीबार केला.
  • या गोळीबारात 18 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि तीन शिक्षकांनाही आपला जीव गमवावा लागला.

 Texas Shooting At School :  टेक्सास : अमेरिकेतील (America) टेक्सासमधील (Texas ) शाळेत भीषण गोळीबार (Shooting ) झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये 18 मुलांचा तर तीन शिक्षकंचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. टेक्सासमधील उवाल्डे शहरात गोळीबारीची घटना घडली असून हल्लेखोर हा 18 वर्षाचा असून त्याने रॉब एलिमेंटरी स्कूलमधील विद्यार्थ्यांवर अंधाधुंद गोळीबार केला. या घटनेची संपूर्ण माहिती टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी दिली. 

गव्हर्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला धोकादायक आहे. या 18 वर्षीय शूटरने अचानक शाळेच्या कॅम्पसमध्ये प्रवेश केला आणि अचानक गोळीबार सुरू केला. आरोपी शूटरने दुसरी, तिसरी आणि चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना लक्ष्य केलं. या गोळीबारात 18 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि तीन शिक्षकांनाही आपला जीव गमवावा लागला. आरोपी शूटरने हल्ला केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली.  

पोलिसांना गोळीबाराची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ फोर्स घटनास्थळी पाठवण्यात आलं. यावेळी मुलांच्या पालकांना कॅम्पसमध्ये न जाण्याचं आवाहन केलं गेलं. मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा आणखी वाढण्याचीही भीती आहे. सध्या राज्यपालांच्या आदेशानंतर टेक्सासच्या रेंजर्सनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. स्थानिक पोलिसांकडूनही सहकार्य घेतले जात आहे.

या घटनेप्रकरणी व्हाईट हाऊसवरुन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची प्रतिक्रिया आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. राष्ट्राला संबोधित करताना ते म्हणाले की, आता अशा गुन्ह्यांवर कारवाई करण्याची वेळ आली आहे. कायद्याच्या विरोधात जाऊन बंदुका उचलणाऱ्यांना आपण सांगायला हवे, त्यांना आम्ही माफ करणार नाहीत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी