Johannesburg Shooting: जोहान्सबर्गच्या बारमध्ये घुसून हल्लेखोरांचा अंदाधुंद गोळीबार, 14 ठार, 10 हून अधिक जखमी

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील एका बारमध्ये झालेल्या गोळीबारात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी मध्यरात्रीनंतर जोहान्सबर्ग येथील  सोवेटो या बारमध्ये प्रवेश केला आणि अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर बंदूकधारी पांढऱ्या टोयोटा क्वांटम मिनीबसमधून पळून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, 10 जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींमध्ये तरुणांचाही समावेश आहे. दरम्यान अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Johannesburg Shooting in bar
जोहान्सबर्गच्या बारमध्ये घुसून हल्लेखोरांचा अंदाधुंद गोळीबार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मृतांचे वय 19 ते 35 वर्षांच्या दरम्यान
  • ही घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली

Firing in Johannesburg : जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील एका बारमध्ये झालेल्या गोळीबारात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी मध्यरात्रीनंतर जोहान्सबर्ग येथील  सोवेटो या बारमध्ये प्रवेश केला आणि अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर बंदूकधारी पांढऱ्या टोयोटा क्वांटम मिनीबसमधून पळून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, 10 जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींमध्ये तरुणांचाही समावेश आहे. दरम्यान अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

द सनच्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी गौतेंगचे पोलिस आयुक्त इलियास मावेला म्हणाले, 'प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की बारमध्ये लोक मजा करत होते. हल्लेखोर आत आले आणि त्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार सुरू केला. दरम्यान तपास अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.  ही घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली, असे मावेला यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि रुग्णालयात पोहोचल्यावर आणखी एकाचा जीव गेला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर 14 व्या व्यक्तीचाही मृत्यू झाला. 

मृत्यू झालेल्यांचे वय 19 ते 35 वर्षे दरम्यान 

ENCA वृत्तपत्रानुसार मृतांचे वय 19 ते 35 वर्षांच्या दरम्यान असल्याचे तपासकर्त्यांचे म्हणणे आहे. ऑर्लॅंडो पोलिस स्टेशनचे कमांडर ब्रिगेडियर नॉनहल्लानहला कुबेका यांनी सांगितले की अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाईल.  ऑनलाइन पोस्ट केलेल्या भयानक फुटेजमध्ये जमिनीवर पडलेल्या बारमध्ये लोकांचे मृतदेह दिसत आहेत. क्वाझुलु-नताल येथील पीटरमारिट्झबर्ग बारमध्ये आदल्या दिवशी झालेल्या गोळीबारात चार जण ठार झाले होते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी