रशियातील पर्म विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार: 8 जण ठार; जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी खिडकीतून मारल्या उड्या

रशियातील (Russia) पर्म (Perm) शहरातील विद्यापीठात सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांनी अधाधुंध गोळीबार केला. या गोळीबारात (Shooting) आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.

shooting at Perm University in Russia
रशियातील पर्म विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • सुरक्षा दलांकडून शुटरला ठार करण्यात आले असून हल्लेखोराची ओळख तैमुर बेकमनसुरोव या नावाने पटली आहे.
  • हल्लेखोराचा गोळीबार करण्यामागचा हेतू काय होता. हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.
  • रशियातील पर्म विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार

मोस्को :   रशियातील (Russia) पर्म (Perm) शहरातील विद्यापीठात सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांनी अधाधुंध गोळीबार केला. या गोळीबारात (Shooting) आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे, तर सह जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण विद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सुरक्षा दलांकडून शुटरला ठार करण्यात आले असून हल्लेखोराची ओळख तैमुर बेकमनसुरोव या नावाने पटली आहे.

गोळीबारापासून वाचण्यासाठी विद्यार्थी आणि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी स्वता: ला खोलीत बंद करू घेतलं. हल्लेखोर आत येऊ नये म्हणून खुर्च्या आणि बाकडे दरवाजाला लावले होते. विद्यापीठाचे प्रवक्ते नतालिया पेचिश्वेवा यांनी सांगितले की मास्कोपासून 1300 किलोमीटर दूर असलेल्या पर्म स्टेट विद्यापीठात गोळीबार करणारा हल्लेखोराला ठार करण्यात आले आहे. मात्र, हल्लेखोराचा गोळीबार करण्यामागचा हेतू काय होता. हे अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळावरील फुटेजमध्ये त्याचा मृतदेह बाहेर जमिनीवर पडलेला दिसतो. आधी असे म्हटले जात होते की पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे आणि तो जखमी झाला आहे.

गोळीबारादरम्यान, काही विद्यार्थी आपला जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. स्थानिक माध्यमांनी चावलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये विद्यार्थ्यांची स्थिती  दाखवली आहे.  स्थानिक माध्यमांनी हल्लेखोराची ओळख 18 वर्षीय विद्यार्थी म्हणून केली आहे, ज्याने यापूर्वी सोशल मीडियावर रायफल आणि दारूगोळ्यासह स्वतःचे फोटो पोस्ट केले होते. 

हल्लेखोराने आपल्या फोटोसह लिहिले, 'मी बऱ्याच काळापासून याविषयी विचार करत आहे, बरीच वर्षे झाली आहेत आणि मला समजले की माझे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे''. रशियन गृहमंत्रालयाने सांगितले की, या घटनेनंतर तपास समितीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.हा हल्ला 2018 पासून रशियातील सर्वात घातक गोळीबाराच्या घटनांपैकी एक आहे.  यापूर्वी क्रिमियामधील एका महाविद्यालयात एका विद्यार्थ्याने 20 जणांचा बळी घेतला होता. रशियात, नागरिकांना बंदुक बाळगण्यास सक्त मनाई आहे, परंतु शिकार, स्वसंरक्षण किंवा क्रीडा कार्यक्रमांसाठी बंदुकीची खरेदी केली जाऊ शकते. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी