Shooting in Indian Railway : रेल्वेत गोळीबार, घडली धक्कादायक घटना; पोलीस तपास सुरू

Shooting in the train, a shocking incident happened; Police investigation started : भारताच्या विकासात रेल्वेचे महत्त्वाचे स्थान आहे. याच रेल्वेत एक धक्कादायक घटना घडली.

Shooting in the train, a shocking incident happened; Police investigation started
रेल्वेत गोळीबार, घडली धक्कादायक घटना; पोलीस तपास सुरू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • रेल्वेत गोळीबार
  • घडली धक्कादायक घटना
  • पोलीस तपास सुरू

Shooting in the train, a shocking incident happened; Police investigation started : भारतात वाजवी दरात प्रवास करण्यासाठी उपयुक्त असलेला  सार्वजनिक वाहतुकीचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे रेल्वे. दररोज कोट्यवधी नागरिक प्रवासाकरिता रेल्वेचा वापर करतात. देशात सर्वाधिक रोजगार पुरवणारी संस्था म्हणून रेल्वेकडेच बोट दाखवले जाते. भारताच्या विकासात रेल्वेचे महत्त्वाचे स्थान आहे. याच रेल्वेत एक धक्कादायक घटना घडली.

रेल्वेत गोळीबार झाला. प्रवासी आणि रेल्वे पोलिसांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. एका प्रवाशाचा मृतदेह रेल्वेत होता. पोलिसांनी नियमानुसार पंचनामा करून मृतदेह ताब्यात आणि पोस्टमॉर्टेम करण्यासाठी पाठवला. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.

गोळीबार करण्याचे कारण काय? गोळीबार करण्यासाठी रेल्वे हाच पर्याय का निवडण्यात आला? या दोन प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस मृतदेहाची ओळख पटविण्याचाही प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे.

नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे टर्मिनल स्टेशनवर उभी होती. अचानक गाडीतून गोळीबार झाल्याचा आवाज आला. प्रवासी आणि रेल्वे पोलीस यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. आवाज नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसच्या एका डब्यातून आला होता. या डब्यात पोलिसांनी प्रवेश केला. डब्यात शिरताच पोलिसांना एक मृतदेह आढळला. गोळी जवळून लागल्यामुळे प्रवाशाचा मृत्यू झाला होता. 

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त खास मराठी Greetings

महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त जाणून घ्या ज्योतिबांचे प्रगल्भ विचार

प्रथमदर्शनी प्रवाशाने स्वतःकडे असलेल्या शस्त्राने स्वतःवर गोळीबार केला आणि आत्महत्या केली असे दिसत आहे. मात्र पोलीस सर्व शक्यता तपासून बघत आहेत. गोळीबारासाठी वापरलेले शस्त्र पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले आहे.

कपल्ससाठी मुंबईत फिरण्याचे BEST SPOTS

मुंबईतला राजवाडा आहे मुकेश अंबानींचे घर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी