न्यूयॉर्कमध्ये अंदाधुंद गोळीबार; 10 जणांचा मृत्यू, हेल्मेटच्या कॅमेऱ्यावरुन हल्ल्याचं थेट प्रक्षेपण

अमेरिकेतील (America) न्यूयॉर्कमधील (New York) सुपरमार्केटमध्ये (Supermarket) हल्लेखोरांना(attackers) अंदाधुंद गोळीबार करत 11 लोकांना जखमी केले. यातील 10 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बफेलो (Buffalo) येथील सुपरमार्केटमध्ये शनिवारी दुपारी ही हल्ला केल्याची  घटना घडली.

Shooting of 11 blacks in the United States, live broadcast of the attack
अमेरिकेत 11 कृष्णवर्णीयावर गोळीबार, हल्ल्याचं प्रक्षेपण  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • हल्लेखोराने 13 जणांना गोळ्या घातल्या, त्यापैकी 11 कृष्णवर्णीय आहेत.
  • प्रशासनानं हा हल्ला वर्णभेदातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
  • या हल्ल्याची चौकशी आणि या संशयितांची चौकशी एफबीआयच्या एका टीमकडून करण्यात येत आहे.

Man Opens Fire On People In New York: वॉशिंग्टन : अमेरिकेतील (America) न्यूयॉर्कमधील (New York) सुपरमार्केटमध्ये (Supermarket) हल्लेखोरांना(attackers) अंदाधुंद गोळीबार करत 11 लोकांना जखमी केले. यातील 10 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बफेलो (Buffalo) येथील सुपरमार्केटमध्ये शनिवारी दुपारी ही हल्ला केल्याची  घटना घडली. एपी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार हल्लेखोरानं लष्करी गणवेशासारखे कपडे घातले होते. हल्लेखोर रायफल घेऊन सुपरमर्केटमध्ये घुसला आणि त्यानं गोळीबार करण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. 
दरम्यान, हल्लेखोराने 13 जणांना गोळ्या घातल्या, त्यापैकी 11 कृष्णवर्णीय आहेत. गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी सांगितले की, बफेलो येथील एका सुपरमार्केटमधील घटनेबाबत ती अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. अधिकाऱ्यांने सांगितले की, एक संशयित, तो प्राणघातक हल्ला करण्यासाठी रायफलने सज्ज होता. शनिवारी दुपारी हल्ला करण्यासाठी तो न्यूयॉर्क काउंटीमधील त्याच्या घरापासून काही तास दूर बफेलो येथे आला होता.

संशयिताचे नाव अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्याचे वय 18 वर्षे असल्याचे निष्पन्न झाले आहे. हल्ल्याच्या वेळी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रे होती. या हल्ल्याची चौकशी आणि या संशयितांची चौकशी एफबीआयच्या एका टीमकडून करण्यात येत आहे. हल्लेखोरानं हेल्मेट घातलं होतं त्यातील कॅमेरावरुन गोळीबाराच्या घटनेचं थेट प्रक्षेपण केलं. सुपर मार्केटच्या पार्किंगमध्ये पोहोचल्यावर गाडीतून खाली उतरताच हल्लेखोरानं गोळीबाराला सुरुवात केली. लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये गोळीबार आणि मृत व्यक्तीदेखील दिसून आले आहेत.

प्रशासनानं हा हल्ला वर्णभेदातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. पोलिसांनी 18 वर्षाचा बंदुकधारी हल्लेखोरानं गोळीबार केला असून तो गौरवर्णीय असल्याची माहिती दिली. पोलीस आयुक्त जोसेफ ग्रॅमागलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरानं लष्करी कपडे परिधान केले होते, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्र होती. पोलीस आयुक्त ग्रमागलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरानं सुपरमार्केटबाहेर चार जणांवर गोळीबार केला त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. सुपरमार्केटमधील सुरक्षा रक्षकांनं हल्लेखोरावर गोळीबार केला मात्र बुलेटप्रुफ जॅकेट घातलं असल्यानं तो बचावला असं देखील पोलिसांनी सांगितंल. 
पोलिसांनी या घटनेत ११ जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे. त्यात कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय लोकांचा समावेश आहे. पोलिसांनी सुपरमार्केटमध्ये घुसून हल्लखोराला अटक केली आहे. अटक केलेल्या संशयित हल्लेखोराचं नावं पेटोन जेनड्रोन असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेत गेल्यावर्षी मार्च २०२१ मध्ये देखील एका मॉलमध्ये गोळीबार झाला होता, त्यात १० जणांचा मृत्यू झालेला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी