PUBG: धक्कादायक! पब्जी खेळायला नकार दिला म्हणून आईवर झाडल्या गोळ्या; वडिलांना व्हिडीओ कॉल करून दिली माहिती

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 08, 2022 | 14:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Crime News | पीजीआयच्या यमुनापुरम भागात जेसीओ नवीन सिंह यांची पत्नी साधना सिंह (४८) यांची पिस्तुलाने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

Shots fired at mother for refusing to play pubg, shocking incident in uttar pradesh 
पब्जी खेळायला नकार दिला म्हणून आईवर झाडल्या गोळ्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जेसीओ नवीन सिंह यांची पत्नी साधना सिंह (४८) यांची पिस्तुलाने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
  • पब्जी खेळायला नकार दिला म्हणून आईवर झाडल्या गोळ्या.
  • अल्पवयीन मुलाने वडिलांना व्हिडीओ कॉल करून आईच्या हत्येची माहिती दिली.

Crime News | लखनऊ : पीजीआयच्या यमुनापुरम भागात जेसीओ (Junior commissioned officer) नवीन सिंह यांची पत्नी साधना सिंह (४८) यांची पिस्तुलाने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान त्यांच्या अल्पवयीन मुलावर खुनाचा आरोप करण्यात आला आहे. मुलाची आई साधना ऑनलाइन PUBG आणि इंस्टाग्राम गेम चालवण्यास नकार देत होती असे पोलिसांनी सांगितले. घटनेच्या दोन-तीन दिवसांपूर्वी आईनेही दहा हजार रुपये हरवल्याबद्दल मुलाला मारहाण केली होती. याच रागातून त्याने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

अधिक वाचा : बारावीत मिळालेल्या गुणांबद्दल शंका? लगेच होणार रिचेकिंग

धक्कादायक प्रकाराने उडाली खळबळ

दरम्यान, लष्करातील जेसीओ नवीन सिंह यांचे पीजीआयमधील चरण भट्टा रोडवर यमुनापुरम भागात तीन मजली घर आहे. तेथील स्थानिक लोकांनी सांगितले की त्यांची सध्याची पोस्टिंग पश्चिम बंगालमध्ये आहे. नवीन यांची पत्नी साधना या यमुनापूर येथील घराच्या तळमजल्यावर मुलगा (१६) आणि मुलगी (१०) यांच्यासह राहत होत्या. मंगळवारी संध्याकाळी मुलाने वडील नवीन यांना व्हिडीओ कॉल करून सांगितले की, आई साधना यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांनी बेडवर पडलेल्या अवस्थेत आईचा मृतदेह वडीलांना दाखवला.

नवीन यांनी ओळखीच्या व्यक्तीला पाठवले घरी

जेसीओ नवीन यांनी शेजारी राहणाऱ्या दिनेश या ओळखीच्या व्यक्तीला फोन करून साधना यांच्या हत्येबाबत सांगितले आणि घरी जाऊन पाहण्यास सांगितले. दिनेश त्यांच्या घरी गेला असता दरवाजा त्यांच्या मुलाने उघडला. घरातून उग्र वास येत होता. आत जाऊन पाहिले असता साधना यांचा मृतदेह बेडवर पडलेला होता. अशी माहिती दिनेशने पोलिसांना दिली.

पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव

पोलिस आणि फॉरेन्सिक टीम काही वेळातच घटनास्थळी पोहोचली. साधना यांच्या मृतदेहाजवळ एक परवाना असलेले पिस्तूल पडले होते. पिस्तूल नवीनचे आहे. पोलिसांनी मुलाची चौकशी केली असता त्याच्या वक्तव्यात विरोधाभास आढळून आला. लक्षणीय बाब म्हणजे काही वेळाने मुलाने खुनाची कबुली दिली. मुलाने सांगितले की, शनिवारी रात्री आई आणि तिची बहीण एकत्र झोपले होते. तेव्हा त्याने वडीलांच्या बंदुकीने आईवर गोळ्या झाडल्या. आवाज ऐकून बहिणीला जाग आली तेव्हा त्याने बहिणीला उचलून त्याच्या खोलीत नेले आणि झोपवले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी