Shraddha Murder case: श्रद्धाच्या बँक खात्यातून मोठी रक्कम ट्रान्सफर, आफताबच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड

Shraddha Murder Case updates: श्रद्धा हत्या प्रकरणात आणखी एक नवी माहिती उघड झाली आहे.

Shraddha murder case accused aftab transfer big ammount from shraddha bank account shocking information reveal in investigation
Shraddha Murder case: श्रद्धाच्या बँक खात्यातून मोठी रक्कम ट्रान्सफर, आफताबच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • पोलिसांना संशय आहे की, आरोपीच्या कुटुंबीयांना त्याच्या कृत्याची माहिती मिळाली होती
  • वसई पोलिसांनी आरोपी आफताब याला चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्याचे कुटुंबीय अज्ञात ठिकाणी शिफ्ट झाले

Shraddha Murder Case: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिसांचा तपास जसाजसा पुढे जात आहे तसतशी नवीन धक्कादायक आणि खळबळजनक माहिती उघड होताना दिसून येत आहे. पोलिसांच्या मते, आफताबच्या कृत्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळाली होती आणि त्यांना संशय आल्याने ते दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाले. (Shraddha murder case accused Aftab transfer big amount from shraddha bank account shocking information revealed in investigation read)

वसई पोलिसांकडून चौकशी

रिपोर्ट्सनुसार, वसईतील माणिकपूर पोलिसांनी आरोपी आफताब याला वसईत बोलावले आणि त्यानंतर त्याचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर लगेचच त्याचे कुटुंबीय इतरत्र शिफ्ट झाले. पोलिसांना संशय आहे की, त्यांच्या मुलाने केलेल्या कृत्याबाबत कुटुंबीयांना संशय होता आणि त्यामुळे ते इतरत्र घाई-घाईत शिफ्ट झाले. त्यावेळी आफताब सुद्धा घरी आला आणि त्याने आपले सुद्धा काही सामान तेथून नेले.

हे पण वाचा : हिवाळ्यात चुकूनही खाऊ-पिऊ नका हे 6 पदार्थ

चौकशीत धक्कादायक माहिती उघड

पोलिसांनी आफताबला दुसऱ्यांदा 3 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले होते. यावेळी चौकशीत हत्याकांडाच्या संदर्भात अनेक खुलासे झाले. त्यानंतर वसई पोलीस 8 नोव्हेंबर रोजी दिल्लीत पोहोचले. वसईतील माणिकपूर पोलिसांनी जेव्हा आफताबचा जबाब नोंदवण्यास सुरुवात केली तेव्हा त्याची बॉडी लॅन्ग्वेज एखाद्या प्रोफेशनल किलर सारखी होती.

हे पण वाचा : दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

पोलिसांच्या मते, आफताब खोटं बोलंत असल्याचं तपासात समोर आल्यानंतरही तो पोलिसांसोबत डोळ्यात डोळे घालून बोलत होता. श्रद्धाची हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे करुन फेकल्याचा आफताबला कोणताही पश्चाताप नव्हता. मात्र एका खोट्याने त्याची पोलखोल केली.

हे पण वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती फोनवर कशा प्रकारे बोलते?

बँकेतून मोठी रक्कम ट्रान्सफर

26 ऑक्टोबर रोजी वसई पोलिसांनी आफताबचा पहिल्यांदा जबाब घेतला मात्र, तो केवळ तोंडी जबाब होता. आपल्या जबाबात तो केवळ वाद झाल्यावर निघून जाण्याचं सांगत होता. पण 3 नोव्हेंबर रोजी त्याचा लेखी जबाब घेण्यात आला. यावेळी पोलिसांनी कागदी पुरावे आणि बँक डिटेल्स, मोबाइल लोकेशन सर्व सोबत घेऊन चौकशी केली. यावेळी आफताबकडे कोणतंही उत्तर नव्हतं. श्रद्धाचा फोन 26 मे रोजी बंद झालेला. वसई पोलिसांच्या चौकशीत समोर आले की, श्रद्धाचा फोन 22 मे ते 26मे या दरम्यान ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरण्यात आला. श्रद्धाच्या बँक अकाऊंटमधून 54000 रुपये ट्रान्सफर झाले होते. ज्यावेळी हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झाले त्यावेळी तिच्या फोनचं लोकेशन हे छतरपूर होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी