Shocking! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव-इनमध्ये राहणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या, श्रद्धा केस पाहिल्यावर आरोपीने रचला कट

Live-in partner murder in Delhi: श्रद्धा हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली. या हत्या प्रकरणानंतर आता आणखी एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलं आहे. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • श्रद्धा वालकर हत्याकांड पाहिल्यावर आरोपीने रचलं षडयंत्र
  • लिव-इनमध्ये राहणाऱ्या तरुणीची केली निर्घृण हत्या
  • आरोपीला पोलिसांनी केली अटक

Shraddha Walkar Murder case repetition: दिल्लीतील टिळक नगर परिसरातील एका घरात महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतक महिलेची तिच्याच लिव्ह इन पार्टनरने हत्या केल्याचं समोर आलं आहे. आरोपीने या महिलेची चाकू ने हत्या केली. या प्रकरणात दिल्ली क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक केली आहे. पंजाबमधून आरोपीला अटक करण्यात आली आहे. (shraddha murder case repetition in delhi man kills live-in partner made plan after seeing shraddha murder case read in marathi)

आरोपीचं नाव मनप्रीत असून यापूर्वी सुद्धा त्याच्यावर अपहरण आणि हत्याचे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे. लिव-इनमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आरोपी मनप्रीत संदर्भात पोलिसांनी सांगितले की, तो दिल्लीत सेकंड हँड कारची खरेदी-विक्री करण्याचं काम करतो. त्याचे वडील अमेरिकेत स्थायिक आहेत. आरोपीचं 2006 मध्ये लग्न झालं होतं. आरोपीला दोन मुले सुद्धा आहेत. मात्र, आरोपी हा 2015 मध्ये रेखा नावाच्या महिलेच्या संपर्कात आला आणि त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

हे पण वाचा : डिसेंबर महिन्यात 6 ग्रहांचे गोचर, या राशीच्या व्यक्तींवर होणार धनवर्षाव

मुलीला झोपेची गोळी दिली

मनप्रीतने गणेश नगर परिसरात एक खोली भाड्याने घेतली होती. या खोलीत रेखासोबत मनप्रीत लिव-इनमध्ये राहत होता. मात्र, आपण या नात्यात अडकल्याचं मनप्रीतला वाटू लागलं. त्यामुळे त्याने रेखाला आपल्या आयुष्यातून दूर करण्याचा निर्णय घेतला. 1 डिसेंबरच्या रात्री त्याने रेखाच्या घरी जावून तिच्या 16 वर्षीय मुलीला एका शितपेयात झोपेची गोळी दिली. त्यानंतर ही मुलगी झोपली.

हे पण वाचा : पुरुषांसाठी चिंच खूपच फायदेशीर, लैंगिक समस्याही होईल दूर

यानंतर आरोपी मनप्रीतने रेखाची हत्या केली. पोलिसांना संशय आहे की, श्रद्धा वालकर हत्या प्रकरण पाहिल्यानंतर आरोपी मनप्रीतने त्याच पद्धतीने रेखाची हत्या करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे त्याने त्याच पद्धतीने रेखाच्या हत्येचं प्लॅनिंग केलं. मात्र, घरात असलेल्या 16 वर्षीय मुलीमुळे मनप्रीतला रेखाच्या मृतदेहाचे तुकडे करणे शक्य झालं नाही. त्यामुळे त्याने मृतदेह तेथेच टाकून पळ काढला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी