जंगलात मिळाली हाडे, श्रद्धा मर्डर केसची आणखी रहस्य उलगडण्याची शक्यता

shraddha murder case will bones found from-delhi forest reveal new secrets, shraddha walker murder case : श्रद्धा वालकर प्रकरणात नवी माहिती हाती येण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी छतरपूरच्या जंगलातून काही हाडे जप्त केली आहेत.

shraddha murder case will bones found from-delhi forest reveal new secrets, shraddha walker murder case
जंगलात मिळाली हाडे, श्रद्धा मर्डर केसची आणखी रहस्य उलगडण्याची शक्यता  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जंगलात मिळाली हाडे, श्रद्धा मर्डर केसची आणखी रहस्य उलगडण्याची शक्यता
  • दिल्ली पोलिसांनी छतरपूरच्या जंगलातून काही हाडे जप्त केली
  • हाडांची मेडिकल टेस्ट होणार

shraddha murder case will bones found from-delhi forest reveal new secrets, shraddha walker murder case : श्रद्धा वालकर प्रकरणात नवी माहिती हाती येण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी छतरपूरच्या जंगलातून काही हाडे जप्त केली आहेत. या हाडांची मेडिकल टेस्ट होणार आहे.

श्रद्धा वालकर मर्डर केस

मूळच्या महाराष्ट्रातल्या श्रद्धा वालकरची (shraddha walker) दिल्लीत हत्या झाली. श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. या धक्कादायक प्रकरणात श्रद्धासोबत लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या आफताब पूनावालाला (aaftab poonawala) अटक करण्यात आली आहे. आफताबने पोलीस चौकशी दरम्यान श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाची तुकडे करून विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी छतरपूरच्या जंगलात गेल्याचेही आफताबने कबुल केले आहे. 

Data Protection Bill : डेटा चोरी करणाऱ्यांची आता खैर नाही, भरावा लागेल 500 कोटी रुपयांचा दंड

International Men’s Day: सर्वप्रथम कधी साजरा झाला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन? वाचा इतिहास आणि महत्त्व

जंगलात केली तपासणी

आफताबने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी छतरपूरमधील मेहरौलीच्या जंगलात कसून तपासणी केली. या तपासणीदरम्यान पोलिसांनी काही मानवी हाडे जप्त केली. ही हाडे महिलेची किंवा तरुणीची असावीत असा प्राथमिक अंदाज आहे. मेडिकल टेस्टनंतर या बाबतीत ठोस माहिती हाती येईल. 

मुंबईच्या डॉक्टरने दिली नवी माहिती

मुंबईतील मालाडच्या एका मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर प्रणव काबरा यांनी Times Now Navbharat ला नवी माहिती दिली. श्रद्धा काही काळ मालाडच्या एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होता. याच काळात मालाडमध्ये काही जणांशी श्रद्धाची ओळख झाली. या ओळखीतल्या व्यक्तींपैकी एका व्यक्तीचा संदर्भ देत श्रद्धाने प्रणव काबरा यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. वैद्यकीय सल्ला मागितला होता. डॉक्टर प्रणव काबरा एरवी फोनवरून वैद्यकीय सल्ला देत नाहीत. पण ओळखीतल्या व्यक्तीचे नाव सांगितले म्हणून ते थोडा वेळ श्रद्धाशी बोलले होते. ही घटना फेब्रुवारी 2021 मध्ये घडली होती.

आफताबचे विकृत वर्तन

आफताब अमीन पूनावाला विकृत वर्तन करत होता. तो धूम्रपान करत होता. काही वेळा पेटती सिगरेट श्रद्धाच्या पाठीवर विझवत होता. श्रद्धाने विरोध केला तर तिला मारहाण करायचा. चेहऱ्यावर इजा करायचा. काही वेळा आफताबने मी आत्महत्या करेन आणि जाताना या प्रकरणात तुला आणि तुझ्या घरच्यांना अडकवेन अशा धमक्या दिल्या होत्या. याच कारणामुळे आफताब जे म्हणेल ते ऐकत श्रद्धा जगत होती. ती आफताबसोबत मागील काही काळापासून दिल्लीत वास्तव्यास होती. या काळात आफताबने अनेकदा श्रद्धा इजा केली. पण श्रद्धा भीतीपोटी सगळे सहन करत होती. दिल्ली पोलीस सध्या श्रद्धासोबतचे आफताबने मागील काही महिन्यांतले वर्तन तसेच हत्या प्रकरण या दोन्हीचा कसून तपास करत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी