Shraddha murder case accused Aftab Poonawala attacked by two men: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आफताब पूनावाला याला पोलिसांनी अटक केली आहे. आफताब पूनावाला याची चौकशी सुरू असून त्याच्या विविध टेस्ट सुद्धा केल्या जात आहेत. पॉलिग्राफ टेस्ट नंतर आफताब याला तुरुंगात नेण्यात येत होते. तुरुंगात नेत असताना पोलिसांच्या गाडीवर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. (Shraddha walkar murder case accused aftab poonawalla attacked by two men carrying sword in delhi)
Police detained the two men who attacked the police van carrying Shradhha murder accused Aftab Poonawalla, outside FSL office in Delhi pic.twitter.com/tc7TGACorZ — ANI (@ANI) November 28, 2022
श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्यासोबत लिव इनमध्ये राहणाऱ्या आफताबने हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे करुन ते इतरत्र फेकले. ही घटना समोर येताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. या प्रकरणात आरोपी आफताब पूनावाला याला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. श्रद्धाची हत्या झाल्यानंतर आरोपी आफताब याला कठोरातली कठोर शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. त्याच दरम्यान सोमवारी (28 नोव्हेंबर 2022) आरोपी आफताब याला पॉलिग्राफ टेस्टसाठी एफएसएल लॅब येथे आणण्यात आले होते. त्यानंतर तेथून आफताबला पुन्हा कारागृहात नेण्यात येत होते.
हे पण वाचा : त अक्षरावरुन मुला-मुलींची लेटेस्ट नावे, जाणून घ्या अर्थासह
आफताबला लॅबमधून कारागृहात नेत असताना पोलिसांच्या व्हॅनवर जमावाने हल्ला केला. काहींच्या हातात तलवार सुद्धा होती. या तलवारीने आफताबवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
आरोपी आफताब याला दिल्लीतील रोहिणी येथील एफएसएल लॅबमध्ये पॉलिग्राफ टेस्टसाठी आणण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांची टीम त्याला पुन्हा कारागृहात नेत होती. त्याचवेळी काही जणांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला.
हे पण वाचा : गुळाचा एक तुकडा बदलेल तुमचं आयुष्य, केवळ करावा लागेल हा उपाय
आरोपी आफताब पूनावाला हा श्रद्धा वालकर या तरुणीसोबत लिव-इनमध्ये राहत होता. श्रद्धाकडून वारंवार आफताब याला लग्नाच्या संदर्भात विचारणा होत होती. श्रद्धाकडून वारंवार लग्नाची मागणी होत असल्याने आफताब त्रस्त झाला आणि त्याने श्रद्धाची हत्या केली. धक्कादायक म्हणजे आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि ते आपल्या घरातील फ्रिजमध्ये लपवून ठेवले. कुणालाही याची कुणकुण लागू नये म्हणून त्याने घरात अगरबत्ती, परफ्यूम वापरले. अखेर या प्रकरणाचा उलगडा झाला आणि पोलिसांनी आफताबला बेड्या ठोकल्या.