श्रद्धा मर्डर केस, आफताबच्या नार्को टेस्टमधून मिळाली महत्त्वाची माहिती

shraddha walker murder case, shraddha walkar murder case, Important information obtained from aftab amin poonawalla narco test : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसईची रहिवासी श्रद्धा वालकर (shraddha walker) हिची दिल्लीत हत्या झाली. या प्रकरणात आरोपी आफताब अमीन पूनावाला (Aftab Amin Poonawalla) याची दिल्ली पोलिसांनी पॉलिग्राफिक टेस्ट आणि नार्को टेस्ट केली.

shraddha  murder case
आफताबच्या नार्को टेस्टमधून मिळाली महत्त्वाची माहिती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • श्रद्धा मर्डर केस
  • आफताबच्या नार्को टेस्टमधून मिळाली महत्त्वाची माहिती
  • आफताबने विकलेला श्रद्धाचा मोबाइल पोलिसांनी शोधून जप्त केला

shraddha walker murder case, shraddha walkar murder case, Important information obtained from aftab amin poonawalla narco test : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसईची रहिवासी श्रद्धा वालकर (shraddha walker) हिची दिल्लीत हत्या झाली. या प्रकरणात आरोपी आफताब अमीन पूनावाला (Aftab Amin Poonawalla) याची दिल्ली पोलिसांनी पॉलिग्राफिक टेस्ट आणि नार्को टेस्ट केली. या दोन टेस्टमधून श्रद्धा हत्या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाल्याचे वृत्त आहे. 

दिली श्रद्धाची हत्या केल्याची कबुली

आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली पॉलिग्राफिक टेस्ट आणि नार्को टेस्ट या दोन्ही टेस्टमध्ये दिली. याआधी जेव्हा श्रद्धाच्या हत्येच्या संशयावरून प्राथमिक चौकशी झाली होती तेव्हा पण आफताबने हत्येची कबुली दिली होती. 

श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली

टेस्ट सुरू असताना श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे, तिच्या मोबाइलची विल्हेवाट लावणे यासाठी काय केले ते जाणून घेण्यासाठी आफताबला प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरे आफताबने दिली. ही उत्तरे मिळाल्यानंतर नव्या सर्च ऑपरेशनची तयारी दिल्ली पोलिसांनी सुरू केल्याचे वृत्त आहे. 

श्रद्धाचा मोबाइल एका तरुणाला विकला

आफताबने एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून श्रद्धाचा मोबाइल एका तरुणाला विकला होता. हा मोबाइल आधी आफताब आणि नंतर खरेदी करणाऱ्या व्यक्तीने फॉरमॅट केला. पण पोलिसांनी हा मोबाइल आता जप्त करून जुना डेटा रिट्रिव्ह करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

नार्को टेस्टबाबतच्या संविधानातील तरतुदी

भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार पॉलिग्राफिक टेस्ट आणि नार्को टेस्ट यांना ठोस पुरावा म्हणून न्यायालयात सादर करता येत नाही. पण टेस्टमधून मिळालेल्या माहितीआधारे सर्च ऑपरेशन करता येतात. तसेच विशिष्ट वस्तूंची लॅब टेस्ट करून पुरावे मिळवता येतात. नंतर टेस्टचा रिपोर्ट आणि गोळा केलेले पुरावे संयुक्तपणे कोर्टात सादर करून आरोपी विरोधात तपास यंत्रणा त्यांची बाजू आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न करू शकतात. 

पॉलिग्राफिक टेस्ट आणि नार्को टेस्ट या दोन्ही टेस्टमध्ये प्रश्न विचारल्यावर उत्तर किती वेळात दिले, काय दिले, उत्तर दिले त्यावेळी घाम आला होता की नाही, रक्तदाब, श्वसनाचा दर आणि हृदयाचे ठोके यांची स्थिती काय होती अशा अनेक मुद्यांवरून तज्ज्ञ उत्तर देणारा खरं बोलतोय की नाही; याचे विश्लेषण करून अहवाल देतात. 

जी व्यक्ती आधीपासून अंमली पदार्थांचे सेवन करते त्या व्यक्तीवर नार्को टेस्टसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा प्रभाव कमी प्रमाणात होण्याची शक्यता असते. यामुळे आफताब किती खरं बोलला हे सर्च ऑपरेशन केल्यावर स्पष्ट होईल. 

आफताबने सांगितले श्रद्धाची हत्या करण्याचे कारण

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धा आफताबच्या वर्तनाला वैतागून कायमची स्वतःच्या घरी जाण्याबाबत विचार करत होती. हाच विचार श्रद्धाने आफताबला उघडपणे बोलून दाखविला होता. यानंतरच आफताबने श्रद्धाची हत्या केली आणि ही माहिती आफताबने टेस्ट दरम्यान दिली. 

Shraddha Murder case: क्राईम सीरिज पाहून गर्लफ्रेंडचे 35 तुकडे केले, असं काय आहे या अमेरिकन टीव्ही शोमध्ये? 

Data Protection Bill : डेटा चोरी करणाऱ्यांची आता खैर नाही, भरावा लागेल 500 कोटी रुपयांचा दंड

आफताबने केली श्रद्धा वालकरची (shraddha walker) हत्या

श्रद्धा मुंबईत मालाड येथे एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होती, त्यावेळी तिची आणि आफताबची ओळख झाली. दोघे लिव्ह इन मध्ये राहू लागले. श्रद्धाच्या या वर्तनाला घरून विरोध होऊ लागला. या विरोधाला उत्तर म्हणून श्रद्धा आणि आफताब महाराष्ट्र सोडून दिल्लीत राहू लागले. बहुराष्ट्रीय कंपनीत श्रद्धाची नोकरी सुरू होती. आफताब पण काम करत होता. पण दिल्लीत आल्यापासून दोघांमध्ये अधूनमधून वाद होत होते. वाद वाढला तर प्रत्येकवेळी आफताब आत्महत्या करेन अशी धमकी द्यायचा. मी आत्महत्या केली तर तू आणि तुझ्या घरच्यांना पोलीस अटक करतील असे सांगून आफताब श्रद्धाला घाबरवत होता. तसेच श्रद्धाला मारहाण करणे, तिच्या चेहऱ्यावर जखमा करणे, श्रद्धाच्या पाठीवर सिगरेट विझविणे, श्रद्धाला सतत शारीरिक आणि मानसिक त्रास देणे असे प्रकार आफताब करत होता. एक दिवस वाद सुरू असताना गळा आवळून आफताबने श्रद्धाची हत्या केली. नंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. हे तुकडे घरातल्या फ्रिजमध्ये ठेवले. यानंतर पुढील 5-6 महिन्यांत टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आफताबने श्रद्धाच्या शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट लावली. प्रामुख्याने छतरपूरच्या जंगलात त्याने श्रद्धाच्या शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट लावली. श्रद्धाचं डोकं (शिर) आफताबने मैदान गढी येथील तलावात (झील) फेकल्याचे पोलिसांना सांगितले. ही माहिती मिळताच पोलिसांनी मैदान गढी येथील तलावातले (झील) पाणी उपसून तिथे तपास सुरू केला आहे.

आफताब छतरपूरच्या जंगलात जात असल्याचे सीसीटीव्ही फूटेज पण पोलिसांच्या हाती आले आहे. या फूटेजच्या मदतीने पोलिसांनी छतरपूरच्या जंगलात तपास सुरू केला आहे. पोलीस पथकाने छतरपूरमधील मेहरौलीच्या जंगलातून 17 मानवी हाडे जप्त केली आहेत. या हाडांच्या वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. ही हाडे महिलेची किंवा तरुणीची असावीत असा प्राथमिक अंदाज आहे.

श्रद्धाचे फ्रेंड, श्रद्धाशी फोनवरून बोललेले मुंबईतील एक डॉक्टर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. आफताबचे वर्तन यासंदर्भात श्रद्धाला ओळखणाऱ्यांकडून धक्कादायक गौप्यस्फोट सुरू आहेत. पोलीस या माहितीचाही तपासाकरिता उपयोग करून घेण्याची शक्यता आहे.

न्यायालयीन कोठडीत आफताब

कोर्टाने आफताब अमीन पूनावाला (Aftab Amin Poonawalla) याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर आफताबला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. याच जेलमधून आफताबला टेस्टसाठी नेण्यात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी