माझ्या लहानपणीच्या मित्राला ट्विटवर फॉलो करा, पराग अग्रवालसाठी श्रेया घोषालने केलेले ट्विट व्हायरल

shreya ghoshal twitter | नेटकर्‍यांनी श्रेया आणि परागचे जुने फोटोही शोधून काढले आहे. या फोटोंमध्ये श्रेया घोषाल तिचा पती शिलादित्य आणि पराग त्याची बायको विनीतासोबत दिसत आहे.

shreya ghoshal twitter ceo Parag Agrawal old tweets viral
shreya ghoshal parag agrawal 
थोडं पण कामाचं
  • नेटकर्‍यांनी दोघांचे ट्विटरवरील जुने ट्विट्स शोधून काढले आहे.
  • त्यावर पराग अग्रवालनेही प्रतिक्रिया दिली होती,
  • शुभेच्छा द्या आणि ट्विटरवर फॉलो करा असे आवाहन श्रेयाने केले होते.

पराग अग्रवाल (parag agrawal ) ट्विटरच्या सीईओपदी (twitter ceo) निवड झाल्यानंतर सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने (shreya ghoshal)  त्याचे अभिनंदन केले आहे. तसेच याबद्दल तुझा अभिमान असल्याची प्रतिक्रिया श्रेयाने दिली आहे. श्रेयाने परागला शुभेच्छा दिल्यानंतर नेटकर्‍यांनी दोघांचे ट्विटरवरील जुने ट्विट्स शोधून काढले आहे. ११ वर्षापूर्वी श्रेयाने आपला मित्र परागला ट्विटरवर फॉले करा असे आवाहन केले होते.

२३ मे २०१० रोजी श्रेयाने ट्विट केले होते की, मला आणखी एक लहानपणीचा मित्र भेटला आहे. पराग खवय्या आणि फिरणारा  असून तो स्टॅनफोर्ड विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. कालच त्याचा वाढदिवस होता, त्याला शुभेच्छा द्या आणि ट्विटरवर फॉलो करा असे आवाहन श्रेयाने केले होते.

त्यावर पराग अग्रवालनेही प्रतिक्रिया दिली होती, आयला, तु मोठी इफ्लुएन्सर आहेस, तुझ्या ट्विटमुळे फॉलोअर्स आणि मेसेजसचा पूर आल्याचे त्याने म्हटले होते.

नेटकर्‍यानी श्रेया आणि परागचे जुने फोटोही शोधून काढले आहे. या फोटोंमध्ये श्रेया घोषाल तिचा पती शिलादित्य आणि पराग त्याची बायको विनीतासोबत दिसत आहे.

ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी (jack dorsey ) यांनी राजीनामा दिल्यानंतर  सीटीओ पराग अग्रवालची सीईओपदी वर्णी लागली असतील. पराग अग्रवाल आयआयटी बॉम्बेमधून पदवीधर आहेत. Twitter चे नवीन CEO अग्रवाल 2011 मध्ये कंपनीत सामील झाले होते आणि ऑक्टोबर 2017 पासून त्यांनी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) म्हणून काम करत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी