स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचं निधन; आतापर्यंत 34 वेळा केलंय मतदान

हिमाचलच्या किन्नौर येथील रहिवासी असलेल्या शायन सरन नेगीने 2 नोव्हेंबरला पोस्टल बॅलेटद्वारे हिमाचल निवडणुकीसाठी मतदान केले होते. श्याम सरण नेगी यांच्या मतदानाने लोकशाहीची सुरुवात झाली होती.

Shyam Saran Negi, the first voter of independent India, passed away
स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचं निधन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हिमाचलमधील लोक त्यांना मास्टर नेगी या नावानेही ओळखतात.
  • 2 नोव्हेंबर रोजी केलेलं मतदान नेगी यांचं शेवटचं मतदान ठरलं.
  • भारतातील सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारी 1952 मध्ये पहिल्यांदा पार पडल्या.

नवी दिल्ली : स्वतंत्र भारताचे पहिले मतदार ( First Indian Voter ) श्याम सरण नेगी ( Shyam Saran Negi ) यांचं निधन झालं. हिमाचलच्या किन्नौर येथील रहिवासी असलेल्या शायन सरन नेगीने 2 नोव्हेंबरला पोस्टल बॅलेटद्वारे हिमाचल निवडणुकीसाठी मतदान केले होते. श्याम सरण नेगी यांच्या मतदानाने लोकशाहीची सुरुवात झाली होती. श्याम सरन नेगी यांचा मुलगा सीपी नेगी यांनी सांगितले की, त्यांचे वडील खूप दिवसांपासून आजारी होते आणि आज पहाटे 3 वाजता त्यांचे निधन झाले. आज आदरपूर्वक अंत्यसंस्कार केले जातील, असे डीसी किन्नौर आबिद हुसैन सादिक यांनी सांगितले.  (Shyam Saran Negi, the first voter of independent India, passed away; Voted 34 times so far)

अधिक वाचा  :मुंबईत पुन्हा सीएनजी-पीएनजीच्या दरात वाढ

नेगी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना, हिमाचलचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर म्हणाले- "स्वतंत्र भारताचे पहिले मतदार आणि किन्नौरचे श्याम सरन नेगी जी यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. आपले कर्तव्य बजावत असताना त्यांनी 2 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी 34व्यांदा मतदान केले, ही आठवण सदैव भावूक करेल. ईश्वर त्यांच्या पुण्यवान आत्म्यास त्यांच्या चरणी चिरशांती देवो आणि शोकाकुल परिवारास बळ देवो. 

बूथवरच करायचं होतं मतदान

बूथवर जाऊन मतदान करण्याची त्यांची इच्छा होती. यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाचा फॉर्मही परत केला होता, मात्र त्यांची तब्येत बिघडल्याने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी पोहोचून पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करून घेतले.  2 नोव्हेंबर रोजी केलेलं मतदान नेगी यांचं शेवटचं मतदान ठरलं.

अधिक वाचा  : 'द केरला स्टोरी'चा टीझर आऊट

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार 

भारतातील सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारी 1952 मध्ये पहिल्यांदा पार पडल्या, परंतु किन्नौरच्या उंच प्रदेशात मतदान पाच महिने अगोदर, 25 ऑक्टोबर 1951 रोजी झाले होते.कारण खराब हिवाळ्याच्या हवामानात बर्फात निवडणुका घेणे अशक्य असल्याने निवडणूक आयोगाने तो निर्णय घेतला होता.  1951 मध्ये नेगी यांनी पहिल्यांदाच संसदीय निवडणुकीत मतदान केले. परंतु निवडणूक आयोगाने पाच महिन्याआधी मतदान घेण्याचं ठरवल्याने मतदान केंद्र दुसऱ्याकडे हलविले होते. त्यामुळे त्यांना दुसऱ्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे लागले. 

अधिक वाचा  : पुरुषांच्या या तीन सवय पाहून महिला होत असतात घायाळ

नेगी यांनी कल्पा या सरकारी शाळेत पोहचल्यानंतर त्यांनी मतदान केलं. यानंतर त्यांनी एकाही निवडणुकीत आपला सहभाग सोडला नाही. मला माझ्या मताचे महत्त्व माहित आहे, असं नेगी सांगायचे.  दरम्यान,  'शरीर साथ देत नसेल तर स्वबळाच्या जोरावर मला मतदानाला जायचं आहे. या निवडणुकीत माझे हे शेवटचे मतदान असू शकते,' अशी भीतीही त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. 

लोकसभेत 16 वेळा मतदान

जुलै 1917 मध्ये जन्मलेल्या श्याम सरन नेगी यांनी लोकसभा निवडणुकीत सोळा वेळा मतदान केले. 1951 नंतर त्यांनी प्रत्येक लोकसभा, विधानसभा आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान केले. त्यांनी एकूण 34 वेळा मतदान केले आहे. हिमाचलमधील लोक त्यांना मास्टर नेगी या नावानेही ओळखतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी