Navjot Sidhu-Daler Mehndi: माजी क्रिकेटपटू (Former cricketer) आणि काँग्रेस नेते (Congress leader) नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) काही दिवसांपूर्वी कॉमेडी शोमध्ये हसताना दिसत होते. वाह गुरु, वाह गुरू म्हणत कौतुकाचे पूल बांधायचे. पण काळाचे चाक फिरले असून सिद्धू आता तुरुंगात जावे लागले आहे. एका प्रकरणात सिद्धू यांना अटक करण्यात आले असून पटियालाच्या (Patiala) तुरुंगात (prison) त्यांना ठेवण्यात आले आहे.
दरम्यान तुरुंगात त्यांना एक साथीदार मिळाला आहे शिवाय येथे सिद्धू यांना कारकूनीचं काम देण्यात आले आहे. तर तुरुंगात असलेला त्याचा साथीदार गायक दलेर मेहंदी हे दोघेही एकाच बॅरेकमध्ये असून मेहंदी यांना हिशोबनीसचं काम तुरुंगात मिळालं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंग प्रशासनाने नवज्योत सिद्धू आणि दलेर मेहंदी यांना पटियाला जेलच्या एकाच बॅरेकमध्ये ठेवले आहे. सिद्धू आणि दलेर मेहंदीला ज्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे त्याचा नंबर 10 आहे. दलेर कबुतरफेकीप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की शिक्षा मिळाल्यानंतर दलेर मेहंदी खूप निराश दिसत होते, त्यानंतर सिद्धूने त्याला बोलून प्रोत्साहन दिले.
Read Also : बारावी पास उमेदवारांना नौदलात नोकरीची संधी, लवकर करा अर्ज
दलेर मेहंदीला तुरुंगात हिशोबनीसचं काम देण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. तोही सिद्धूप्रमाणेच बॅरेकमधून काम करणार आहे. तर रोड रेज प्रकरणी शिक्षा भोगत असलेला नवज्योत सिद्धू कारागृहात लिपिक म्हणून काम करत आहे. सिद्धू आणि दलेर मेहंदी हे जुने मित्र आहेत. दोघेही अनेक टीव्ही शोमध्ये एकत्र दिसले आहेत. अशा वेळी एकाच बॅराकीत राहताना जुन्या आठवणी ताज्या होतील .
खासदार सुखबीर बादल यांचे मेहुणे असलेले शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजिठिया यांच्यासह इतरही उच्चभ्रू राजकारणी तुरुंगात आहेत. अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात तो पटियाला सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.
Read Also: निधी आणण्याच्या श्रेयवादावरुन मुंडे बहिण-भावात रस्सीखेच
1988 च्या रोड रेज प्रकरणी सिद्धूला सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती ज्यात 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. सिद्धूला या प्रकरणात आधी दंड भरल्यानंतरच सोडण्यात आले होते, परंतु पीडितेच्या कुटुंबाने त्याविरोधात पुनर्विलोकन याचिका दाखल केली, ज्यावर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली.