Sidhu Moose Wala father Balkaur Singh received threat sms: सिद्धू मुसेवाला याचे वडील बलकौर सिंग यांना पाकिस्तानी नंबरवरून धमकीचे मेसेज येत असल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रसिद्ध पंजाबी गायक असलेल्या सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) याच्या हत्येनंतर त्याच्या वडिलांना धमकीचे मेसेज आल्याने एकच खळबळ उडाली आहे. असे म्हटले जात आहे की, धमकावणाऱ्यांकडून "आता पुढचा नंबर तुमचा असेल" अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. तर आपल्या मुलाच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळेपर्यंत लढाई लढतच राहणार असा निर्धार सिद्धू मुसेवाला याच्या वडिलांनी केला आहे. (Sidhu moose wala father received threatening message from Pakistan number crime news)
सिद्धू मुसेवाला याच्या नातेवाईकांनी सांगितले की, सिद्धूचे वडील बलकौर सिंग यांना पाकिस्तानमधील फोन नंबरवरुन धमकीचे मेसेज येत आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा : Lip lock video viral: कॉलेज विद्यार्थ्यांचं लीप लॉक चॅलेंज, व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग...
मंगळवारी सिद्धू मुसेवाला याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजच्या स्टोरीवरील सेक्शनमध्ये एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोच्या माध्यमातून अशा लोकांना आवाहन केलं आहे जे मुसेवालाच्या आई-वडिलांना भेटू इच्छित आहेत. तसेच त्यांच्या घरी जाऊन मुसेवालाच्या निधनावर शोक व्यक्त करण्याची इच्छा आहे. या पोस्टमध्ये म्हटलं, "सिद्धू मुसेवालाचे आई-वडील काही महिन्यांपासून गावाबाहेर गेले आहेत. त्यांना भेटण्यासाठी जे नागरिक येत आहेत त्यांना आवाहन आहे की, निराश होऊ नका. आम्ही तुम्हाला पोस्टच्या माध्यमातून अपडेट ठेवू".
अधिक वाचा : Importance of Helmet : म्हणून हेल्मेट वापरा…! हा व्हिडिओ शेअर करत पोलिसांनी दिला संदेश
पंजाबमधील अमृतसरजवळ पंजाब पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येत सहभागी असलेले दोन शूटर्स मारले गेले. या घटनेत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. ही चकमक जवळपास पाच तास चालली.
सिद्धू मुसेवाला याच्या मारेकऱ्यांपैकी दोन शूटर्स पोलिसांच्या चकमकीत मारण्यात आले. या गोष्टीचा सिद्धू मुसेवाला याच्या गावातील ग्रामस्थांचा आनंद आहे. दोन संशयित हल्लेखोरांचा खात्मा करण्यात पंजाब पोलिसांच्या शौर्याचं मुसेवालाच्या गावातील नागरिकांनी कौतुक केलं आहे.