Sidhu Moose Wala:  पंजाबमध्ये सिद्धू मुसेवालाचे मारेकरी आणि पोलिसांत उडाली चकमक; एक ठार, तीन पोलीस कर्मचारी जखमी

सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचे मारेकारी आणि पंजाब पोलिसांमध्ये चकमक उडाली आहे. अमृतसरच्या अटारी सीमेवर दोन शार्पशूटर असून पोलिसांनी त्यांना घेरले आहे. या चकमकीत एका शूटरचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या भागाला वेढा घातला आहे.

punjab encounter
पंजाब चकमक  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचे मारेकारी आणि पंजाब पोलिसांमध्ये चकमक उडाली आहे.
  • अमृतसरच्या अटारी सीमेवर दोन शार्पशूटर असून पोलिसांनी त्यांना घेरले आहे.
  • या चकमकीत एका शूटरचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Sidhu Moose Wala:  अमृतसर :  सुप्रसिद्ध पंजाबी गायक (punjabi singer) सिद्धू मुसेवालाचे (Sidhu Moose Wala) मारेकारी आणि पंजाब पोलिसांमध्ये चकमक (encounter) उडाली आहे. अमृतसरच्या अटारी सीमेवर (atari border) दोन शार्पशूटर (sharp shooter) असून पोलिसांनी त्यांना घेरले आहे. या चकमकीत एका शूटरचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या भागाला वेढा घातला आहे. तसेच लोकांना घरातच राहण्यास सांगितले आहे. अटारी सीमेजवळ हे शूटर होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मनप्रीत याने आधी मुसेवालाला गोळी मारली होती. या चकमकीत एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. 

 

अधिक वाचा :  सिद्धू मुसेवालाचे संशयित मारेकरी कॅमेऱ्यात कैद, छायाचित्रे आले जगासमोर


अटारी सीमेजवळ पोलीस

अटारी सीमेजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस पोहोचले आहेत. अटारी सीमेजवळ एन्काऊंटर सुरू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शूटर जगरूपचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. असे असले तरी अधिकृतरित्या या माहितीला दुजोरा देण्यात आलेला नाही. एका गावात हे मारेकरी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हा पोलिसांनी या भागात शोधमोहीम राबवली. तेव्हा एका शूटरने पोलिसांवर गोळीबार केला आणि चकमक उडाली. 


Big Breaking : सिद्धु मुसेवाला प्रकरणात संशयीत शुटर सौरभ महाकालला अटक, पुणे पोलिसांना मोठं यश

मारेकर्‍यांकडे आधुनिक हत्यारं

मिळाळेल्या माहितीनुसार या मारेकर्‍यांकडे आधुनिक हत्यारं आहेत. मुसेवालाला मारण्यासाठी ज्या हत्यारांचा आणि शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला होता ते अजूनही पोलिसांना सापडलेली नाहीत. या दोन मारेकर्‍यांकडे ती हत्यारं आणि शस्त्रास्त्र आहेत अशी प्राथमिक माहिती आहे. जिथे एन्काऊंटर सुरू आहे, तिथल्या रहिवाशांना आपल्या घराची दारे आणि खिडक्या बंद करण्यास सांगितले आहे. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत बाहेर पडण्यासही मनाई केली आहे. 

गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचे धक्कादायक कारण

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी