Sidhu Moosewala 295 song meaning | सिद्धू मूसेवालानं स्वतःच्या मृत्यूचं भाकित केलं होतं? 295 गाण्याचा अर्थ तरी काय?

प्रसिद्ध पंजाबी गायब सिद्धू मूलेवाला याची 29 मे रोजी हत्या झाली होती. हत्येनंतर आता त्यानं काही वर्षांपूर्वी गायलेलं 295 हे गाणं चांगलंच गाजतंय. या गाण्यातून मूसेवालानं आपल्या मृत्यूच्या तारखेचं भाकित केलं होतं की काय, अशी चर्चा सुरू आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे.

Sidhu Moosewala 295 Song
295 गाण्याचा सिद्धू मूसेवालाच्या मृत्यूशी संबंध?  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • सिद्धू मूसेवालाची हत्या झाली होती 29 मे रोजी
  • चाहते जोडतायत 295 या त्याच्या गाजलेल्या गाण्याशी संबंध
  • प्रत्यक्षात 295 या गाण्याची वेगळीच पार्श्वभूमी

Sidhu Moosewala 295 song meaning | सिद्धू मूसेवालानं गायलेल्या 295 या गाण्याच्या माध्यमातून त्यानं आपल्या मृत्यूच्या तारखेचंच (Date of Death) भाकित (Prediction) केलं होतं की काय, असा प्रश्न त्याचे चाहते उपस्थित करत आहेत. सिद्धू मूसेवालाची हत्या 29 मे या दिवशी झाल्यामुळे त्याने अगोदर 295 या गाण्यातून आपल्या मृत्यूची तारीख जाहीर केली होती, असं त्याच्या निस्सिम चाहत्यांना वाटतंय. मात्र प्रत्यक्षात वस्तूस्थिती तशी नाही. चाहत्यांच्या भावना समजण्यासारख्या असल्या तरी वास्तविक सिद्धू मूसेवालानं गायलेलं हे गाणं भारतीय दंडविधानाच्या कलम 295 शी संबंधित आहे. 

IPC तील कलमावर रचलं गाणं

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाचा खून होण्यापूर्वी त्याचं 295 हे गाणं भलतंच गाजलं होतं. आता त्याच्या मृत्यूनंतर त्याचे चाहते वारंवार हे गाणं ऐकत आहेत. प्रत्यक्षात मूसेवालानं हे गाणं भारतीय दंडविधानाच्या कलम 295 चा विचार करून रचलं होतं. अनेकदा वास्तव मांडणाऱ्या नागरिकांवर दबाव टाकण्यासाठी कलम 295 चा वापर सरकारी यंत्रणांकडून केला जातो. त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मूसेवालानं या गाण्याची रचना केली होती. जाणून घेऊया हे कलम नेमकं काय आहे आणि या कलमांतर्गत काय शिक्षा सुनावली जाते. 

कलम 295

भारतीय दंडविधानाच्या कलम 295 नुसार एखादा धर्म, श्रद्धा किंवा पवित्र स्थळ, व्यक्ती आदींबाबत आक्षेपार्ह, अवमानकारक किंवा भावना दुखावतील असे वक्तव्य करणे हा या कलमानुसार गुन्हा मानण्यात येतो. एखाद्या वक्तव्याने कुठल्याही समाजाच्या, धर्माच्या किंवा लोकसमूहाच्या भावना दुखावल्या जाणे हा गुन्हा ठरतो. बेताल वक्तव्यांपासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी या कलमाची निर्मिती करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी या कलमाचा गैरवापर केला जात असल्याच्या घटना आजूबाजूला दिसून येतात. अशा प्रकारांविरोधात मूसेवालानं या गाण्यातून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 

गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षा

कलम 295 अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला जास्तीत जास्त 2 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावण्यात येते. त्यासोबत द्रव्यदंडही आकारला जातो. या कलमांतर्गत नोंदवण्यात आलेला गुन्हा हा अजामीनपात्र आणि बिगर समजुतीचा असतो. 

IPC कलम 295 (अ)

भारतात कुठल्याही व्यक्तीने एखाद्या धर्माचा किंवा समुदायाचा अवमान होईल किंवा भावना दुखावेल असं वक्तव्य केलं, तर त्याला दोषी मानण्यात येतं. भारतीय दंडविधान 1860 च्या कलम 295 (अ) अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात येते. त्याला कमाल दोन वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा सुनावल्या जाऊ शकतात. मॅजिस्ट्रेट पातळीवर ही सुनावणी करण्यात येते. 

29 मे रोजी झाली होती हत्या

सिद्धू मूसेवालाची हत्या 29 मे रोजी झाली होती. सहा हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करून मूसेवालाचा बळी घेतला होता. या हत्येसाठी रशियन बनावटीच्या एके 95 रायफलीचा प्रामुख्याने वापर करण्यात आला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी