तांत्रिक कारणामुळे कोरोना प्रतिबंधक लसचे २० कोटी डोस नष्ट करणार

SII might have to destroy 200 million COVID-19 vaccines says Adar Poonawalla :  तांत्रिक कारणामुळे कोरोना प्रतिबंधक लसचे २० कोटी डोस नष्ट करणार असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली

SII might have to destroy 200 million COVID-19 vaccines says Adar Poonawalla
कोरोना प्रतिबंधक लसचे २० कोटी डोस नष्ट करणार - पूनावाला  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • तांत्रिक कारणामुळे कोरोना प्रतिबंधक लसचे २० कोटी डोस नष्ट करणार
  • सीरमची कोरोना प्रतिबंधक लस कोरोना विषाणूच्या अनेक आधुनिक अवतारांना प्रतिबंध करण्यास सक्षम
  • सीरम इन्स्टिट्युट वर्ष (२०२२) अखेरपर्यंत सर्व्हायकल कॅन्सर या आजारावर एक प्रतिबंधात्मक लस बाजारात आणण्याच्या प्रयत्नात

SII might have to destroy 200 million COVID-19 vaccines says Adar Poonawalla :  दावोस : तांत्रिक कारणामुळे कोरोना प्रतिबंधक लसचे २० कोटी डोस नष्ट करणार असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली. दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये एका भारतीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पूनावाला यांनी ही माहिती दिली. 

जरी २० कोटी डोस नष्ट केले तरी कोरोना प्रतिबंधक लसच्या निर्मितीची प्रक्रिया थांबणार नाही, असेही पूनावाला यांनी स्पष्ट केले. लस निर्मितीसाठी विशिष्ट प्रकारचा कच्चा माल परदेशातून आयात केला जातो. ही प्रक्रिया आणखी वेगवान आणि सुरळीत होणे आवश्यक असल्याचे पूनावाला म्हणाले. 

कोणत्याही लसच्या चाचण्या, निर्मिती प्रक्रिया, वितरण यातील अडथळे दूर झाले तर लस निर्मिती आणि लस वितरणाचा वेग वाढेल. यामुळे आजाराशी लढणे सोपे होईल. अधिकाधिक नागरिक आजारापासून संरक्षण मिळवू शकतील. लस घेतल्याचे प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध झाले आणि त्याला जागतिक मान्यता मिळाली तर लस घेऊन स्वतःला आजारापासून सुरक्षित करण्याकडे नागरिकांचा कल वाढेल; असेही पूनावाला म्हणाले. 

सीरमची कोरोना प्रतिबंधक लस कोरोना विषाणूच्या अनेक आधुनिक अवतारांना प्रतिबंध करण्यास सक्षम आहे, अशी माहिती पूनावाला यांनी दिली. कोरोना संकटाविरुद्ध सीरमची लढाई यशस्वी होण्यात सीरमच्या अनुभवी कर्मचारीवर्गाचे संघटीत प्रयत्न कारणीभूत असल्याचे पूनावाला म्हणाले.

सीरम इन्स्टिट्युट वर्ष (२०२२) अखेरपर्यंत सर्व्हायकल कॅन्सर या आजारावर एक प्रतिबंधात्मक लस बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच डेंग्यू प्रतिबंधात्मक लस आणि पाच आजारांना प्रतिबंध करणारी लस आणण्याची तयारी पण सीरम करत आहे. हे सर्व ठरल्या प्रमाणे झाल्यास सीरम लस क्षेत्रात प्रगतीची नवी शिखरे पार करेल; असा विश्वास पूनावाला यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी