समलिंगींना सेक्सची परवानगी पण लग्नासाठी मनाई, ३७७ ए रद्द

Singapore lifts ban on gay sex, repeals Section 377A but upholds marriage ban : एक मोठा निर्णय झाला आहे. सरकारने ३७७ ए ही कायद्यातील तरतूद निरस्त्र करण्याचा अर्थात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात पुरुष समलिंगींना सेक्स करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Singapore lifts ban on gay sex, repeals Section 377A but upholds marriage ban
समलिंगींना सेक्सची परवानगी पण लग्नासाठी मनाई, ३७७ ए रद्द  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • समलिंगींना सेक्सची परवानगी पण लग्नासाठी मनाई, ३७७ ए रद्द
  • परस्पर सहमतीने पुरुषांनी केलेला समलिंगी सेक्स हा अपराध नाही
  • सिंगापूर (Singapore) सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Singapore lifts ban on gay sex, repeals Section 377A but upholds marriage ban : एक मोठा निर्णय झाला आहे. सरकारने ३७७ ए ही कायद्यातील तरतूद निरस्त्र करण्याचा अर्थात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात पुरुष समलिंगींना सेक्स करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण समलिंगींच्या लग्नावर असलेली बंदी आजही कायम आहे. सिंगापूर (Singapore) सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

BJP Parliamentary Board: पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे काय? कुठले असतात अधिकार? वाचा सविस्तर

सिंगापूमध्ये ३७७ ए या कायद्यानुसार समलिंगी सेक्स हा अपराध (गुन्हा) होता. या अपराधासाठी शिक्षेची तरतूद होती. पण ३७७ ए रद्द करण्याचा निर्णय झाल्यामुळे आता सिंगापूरमध्ये पुरुष समलिंगींना सेक्स केल्याबद्दल शिक्षा होणार नाही. परस्पर सहमतीने पुरुष समलिंगी सेक्स करत असल्यास तो अपराध नसेल असे सिंगापूर सरकारने सांगितले. समलिंगींबाबत लवकरच एक सुधारित कायदा केला जाईल. यात समलिंगी नागरिकांच्या हितांचे रक्षण केले जाईल, असे संकेत सिंगापूर सरकारने दिले. 

कापूस नव्हता म्हणून जखमी महिलेच्या डोक्यावर लावले कंडोमचे पॅकेट, मध्य प्रदेशमधील धक्कादायक घटना

समलिंगी शारीरिक संबंध आणि विवाह या दोन वेगळ्या बाबी आहेत. समाजात फक्त महिला आणि पुरुष यांच्यातच विवाह होऊ शकतो असे सिंगापूरमधील बहुसंख्य नागरिकांचे आजही ठाम मत आहे. याच कारणामुळे सिंगापूर सरकारने समलिंगी विवाहावर असलेली बंदी कायम ठेवली आहे. 

याआधी भारतात २०१८ मध्ये एक निर्णय झाला. या निर्णयानुसार परस्पर सहमतीने केलेला समलिंगी सेक्स हा भारतात अपराध नाही. पण भारतातही समलिंगी विवाहावर बंदी आहे. 

इंग्रजांनी जगातील मोठ्या भूभागावर दीर्घकाळ राज्य केले. या भूभागांमध्ये आजही काही इंग्रजांच्या काळातील कायदे जसेच्या तसे अथवा थोडा बदल करून अस्तित्वात आहेत. यात समिलिंगी सेक्सला अपराध आणि समलिंगी विवाहावर बंदी घालणारे कायदे यांचा समावेश होतो. अलिकडच्या काळात काही देशांनी समलिंगी सेक्स हा अपराध नाही पण समलिंगी विवाहावरील बंदी कायम राहील असा नवा विचार स्वीकारला आहे. आता हा नवा विचार स्वीकारलेल्यांमध्ये सिंगापूरचा समावेश झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी