Lucky Ali : नवी दिल्ली : कर्नाटकात हलाल मांसवरून गदारोळ सुरू आहे. अनेक उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी हलाल मांसाचे बहिष्कार करण्याचे आवाहन केले आहे. अशा वेळी सुप्रसिद्ध गायक लकी अलीने फेसबुक पोस्ट करून आपल्या चाहत्यांना हलालबद्दल माहिती दिली आहे. लकी अलीने फेसबुक पोस्ट लिहून हलाल आणि इस्लाममधील हलासबंधित विश्लेषण केले आहे. नुकतंच भाजपचे राष्ट्रीय महासचिव सीटी राव यांनी हलालची तुलना आर्थिक जिहादशी केली होती.
Dearly Beloved Indian brothers and sisters hope you're all well..I wanted to explain something to you...'halal' is...
Posted by Lucky Ali on Sunday, April 3, 2022
लकी अली यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुस्लिमेतर लोकांचा हलालशी दुरान्वये संबंध नाही. तसेच कोणताही मुस्लिम तसे कोणतेही उत्पादन खरेदी करणार नाही जे हलाल हे कोशेरसारखेच समजणारे ज्यू नातेवाईक आणि उत्पादनातील घटक त्याच्या किंवा तिच्या वापरण्यायोग्य मानकानुसार आहेत. कंपन्या मुस्लिम आणि ज्यू लोकसंख्येसह सर्व प्रकारच्या ग्राहकांना आपला माल विकू इच्छितात. म्हणून त्यांचे उत्पादन विकण्यासाठी त्यांना हलाल प्रमाणित किंवा कोशर प्रमाणित असे लेबल लावावे लागेल. नाही तर मुस्लिम आणि ज्यू त्यांच्याकडून वस्तू खरेदी करणार नाहीत, परंतु जर लोकांना 'हलाल' या शब्दाचा इतका त्रास होत असेल तर त्यांनी ते काढून टाकावे. परंतु त्यांची विक्री पूर्वीसारखीच होईल की नाही हे कोणी सांगू शकत नाही असे लकी अलीने म्हटले आहे.
हलाल हा एक अरबी शब्द आहे आणि त्याचा अर्थ योग्य असा होतो. तर कोशर हा ज्यु धर्मीयांच्या अनुसार हा शब्द तयार झालेल्या स्वयंपाकासाठी केला जातो. मुस्लिम आणि ज्यु ग्राहकांना आपले उत्पादन विकण्यासाठी कंपन्यांना आपल्या उत्पादनावर हलाल आणि कोशर असे नमूद करावे लागेल तरच मुस्लिम आणि ज्यु त्यांच्याकडून वस्तू विकत घेतील असे लकी अलीने म्हटले आहे.