KK Death News: कोलकाता : सुप्रसिद्ध गायक केकेचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले आहे. परंतु केकेच्या चेहर्यावर आणि डोक्यावर जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे कोलकता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. मंगळवारी केकेने आपल्या गाण्याचा कार्यक्रम संपवून ग्रँड हॉटेलमध्ये पोहोचला होता. तेव्हा केकेची तब्येत बिघडली. तेव्हा केकेला तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु जेव्हा केकेला रुग्णालयात आणले तेव्हा डॉक्टरांनी केकेला मृत घोषित केले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेलच्या ज्या रूममध्ये केके थांबला होत त्या खोलीत केके कोसळला. केकेच्या ओठांवर आणि डोक्यावर जखमाही आढळल्या आहेत. (singer kk dies kolkata police registers un natural death case read in marathi)
Singer KK's demise: Case of unnatural death registered, post-mortem to be conducted in Kolkata today — ANI Digital (@ani_digital) June 1, 2022
Read @ANI Story | https://t.co/NVcPXBcbfO#KK #SingerKKDeath #Singer_KK #Postmortem pic.twitter.com/kK5Ru073GE
केकेच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर त्याचे चाहते दुःखात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहित अनेक मान्यवरांनी केकेला श्रद्धांजली वाहिली आहे. केकेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होणार आहे.
केके हा बॉलिवूडमधील एक नावाजलेला गायक होता. २००० ते २०१० या दशकातील केकेची गाणी विषेश गाजली होती. केकेचा मृतदेह कोलकात्यातील एसएसकेएम रुग्णालयात आणला जाणार असून या रुग्णालयातच त्याचे शवविच्छेदन केले जाईल. सध्या पोलीस हॉटेल आणि हॉटेलच्या बाजूचे सर्व सीसीटीव्ही तपासून पाहत आहेत. तसेच हॉटेलचे कर्मचारी आणि केकेच्या शोच्या आयोजकांची चौकशी करत आहेत. केकेने फक्त हिंदीतच नव्हे तर अनेक भारतीय भाषांत गाणी गायली होती. केकेने गुलजार यांच्या माचीस चित्रपटातील छोड आए हम या गाण्याला आवाज दिला होता. त्यानंतर १९९९ साली आलेल्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील तो लूट गये हे गाणे गाजल्यानंतर केके घराघरांत पोहोचला होता.