तिस्तावर मोदींच्या बदनामीसाठी काँग्रेससोबत सेटलमेंट केल्याचा आरोप, तपास सुरू

sit revealed how teesta setlvad received funds from congress ahmed patel : गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीच्या प्रकरणात त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्यासाठी तिस्ता सेटलवाडला काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्याकडून पैशांच्या स्वरुपात मोठी मदत देण्यात आली, अशा स्वरुपाचा आरोप होत आहे.

sit revealed how teesta setlvad received funds from congress ahmed patel
तिस्तावर मोदींच्या बदनामीसाठी काँग्रेससोबत सेटलमेंट केल्याचा आरोप, तपास सुरू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • तिस्तावर मोदींच्या बदनामीसाठी काँग्रेससोबत सेटलमेंट केल्याचा आरोप, तपास सुरू
  • तिस्लाला २००७ मध्ये देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार हा तिने काँग्रेसच्या सूचनेवरून केलेल्या कामगिरीसाठीच देण्यात आल्याचाही आरोप
  • विशेष तपास पथकाने तिस्ता आणि अहमद पटेल यांच्यातील आर्थिक व्यवहाराचा उल्लेख कोर्टात केला, प्रतिज्ञापत्र दिले

sit revealed how teesta setlvad received funds from congress ahmed patel : गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीच्या प्रकरणात त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्यासाठी तिस्ता सेटलवाडला काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्याकडून पैशांच्या स्वरुपात मोठी मदत देण्यात आली, अशा स्वरुपाचा आरोप होत आहे. तिस्ता प्रकरणाचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाने कोर्टात तिस्ताच्या जामिनाला विरोध केला. हा विरोध करताना विशेष तपास पथकाने तिस्ता आणि अहमद पटेल यांच्यातील आर्थिक व्यवहाराचा उल्लेख केला. विशेष तपास पथकाने त्यांचे म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे कोर्टात सादर केले.

तिस्ता सेटलवाडला २००७ मध्ये देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार हा तिने काँग्रेसच्या सूचनेवरून केलेल्या कामगिरीसाठीच देण्यात आल्याचाही आरोप होत आहे. गंभीर आरोप असल्यामुळेच विशेष तपास पथक तिस्ता प्रकरणाचा तपास करत आहे. गुजरात दंगलीतील तिस्ताच्या भूमिकेचा तपास सुरू आहे.

नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्यासाठी मोठे षडयंत्र रचण्यात आले होते. या षडयंत्रात तिस्ता सेटलवाडला मदत करण्यासाठी माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट आणि गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आर. बी श्रीकुमार कार्यरत होते असे आरोप होत आहेत. या आरोपांचा खरेखोटेपणा तपासण्याचे काम विशेष तपास पथक करत आहेत. आतापर्यंत झालेल्या तपासआधारे तिस्ताला अटक करण्यात आली आहे. तिस्ताच्या जामिनाला विशेष तपास पथकाकडून विरोध होत आहे. 

विशेष तपास पथकाने कोर्टात एका व्यक्तीला सादर केले. या व्यक्तीने तिस्ताला पाच लाख रुपये दिले यानंतर दुसऱ्या दिवशी अहमदाबादच्या शाहीबाग सर्किट हाऊस या ठिकाणी अहमद पटेल आणि तिस्ता यांची भेट झाली. या भेटीच्यावेळी तिस्ताने २५ लाख रुपये घेतले; असे विशेष तपास पथकाने कोर्टात सांगितले. 

तिस्ता सेटलवाड आणि संजीव भट्ट यांनी एकदा दिल्लीत अहमद पटेल यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. ही भेट झाली त्यावेळी अहमद पटेल हे काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसच्या त्यावेळच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सल्लागार होते. अहमद पटेल यांच्या घरी तिस्ता गुजरात दंगलीला चार महिने झाल्यानंतर आली होती. तिस्ताला राज्यसभेचे सदस्यत्व पण हवे होते. पण राजकीय गणितांमध्ये ते जुळवून आणणे शक्य झाले नाही. 

तिस्ता सेटलवाड, संजीव भट्ट आणि आर. बी श्रीकुमार यांचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगल प्रकरणात अडकवून गुजरातचे भाजप सरकार पाडणे हा होता. तिस्ताने तर एकदा तीन दिवसांत सरकार पडेल असेही वक्तव्य केले होते. 

दंगल पीडितांच्या मदतीसाठी असे सांगून उभारलेला निधी स्वतःच लाटणे, खोट्या साक्षी रचणे असे आरोप तिस्ता आणि तिच्या सहकाऱ्यांवर होत आहेत. या प्रकरणात विशेष तपास पथकाने तपास सुरू केला आहे. गुलबर्ग सोसायटीचे रहिवासी फिरोजखान पठाण यांनी तिस्ता सेटलवाड आणि सिटिजन्स फॉर जस्टिस अँड पीस या तिस्ताच्या स्वयंसेवी संस्थेविरोधात तक्रार केली आहे. या प्रकरणात एफआयआर दाखल झाली आहे. सबरंग ट्रस्टच्या ६३ लाख आणि ८८ लाख रुपयांचा वापर गुजरात दंगलीच्या पीडितांसाठी होणार होता पण तिस्ताने हे पैसे स्वतःसाठी वापरले असा आरोप फिरोजखान पठाण यांनी केला आहे. 

गुजरात दंगल प्रकरणात नरेंद्र मोदी यांच्यासह ६४ जणांना क्लीनचीट देण्यात आली. यानंतर कोर्टाच्या आदेशाने गुजरात एटीएसने मुंबईतील जुहूतल्या निवासस्थानातून तिस्ता सेटलवाड हिला अटक केले. गुजरात दंगल आणि दंगलीनंतरची सेटलवाडची भूमिका या संदर्भात विशेष तपास पथक तपास करत आहे. कोर्टाच्या आदेशानुसार तपास सुरू आहे. तपासाचा अहवाल कोर्टात सादर होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी