Taliban one year : तालिबानच्या राजवटीची वर्षपूर्ती, सर्वसामान्यांचे हाल, महिलांवर सर्वाधिक निर्बंध

अफगाणिस्तानात तालिबान सरकार सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झालं. एका वर्षात देशाची परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे.

Taliban one year
तालिबानच्या राजवटीची वर्षपूर्ती, महिलांची कुचंबना  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तालिबान सरकारची वर्षपूर्ती
  • अर्ध्याहून अधिक नागरिक गरीब
  • महिलांवर सर्वाधिक अन्याय

Taliban One Year : अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमध्ये (Kabul) तालिबानी फायटर्स (Taliban Fighters) घुसून शहर ताब्यात घेतल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण (One year) झालं आहे. तत्कालीन राष्ट्रपती अशरफ गनी देश सोडून निघून गेल्यानंतर तालिबानी फायटर्स काबूलमध्ये घुसले. 15 ऑगस्ट 2021 या दिवशी तालिबानी फायटर्सनी काबूल शहरासह राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवत देश ताब्यात घेतल्याची घोषणा केली होती. त्यानंतरच्या एका वर्षात तालिबान सरकारच्या राजवटीत देशात सुधारणा होईल की अधोगती होईल, याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र तालिबाननं आपला इतिहासाची पुनरावृत्ती केली असून सर्वसामान्यांचं जगणं बिकट झालं आहे. गेल्या वर्षभरात अफगाणिस्तानातील सर्वसामान्य माणूस अधिकच गरीब झाला असून महिलांवर सर्वाधिक निर्बंध तालिाबन सरकारने घातले आहेत. सरकार स्थापनेनंतर सुधारणावादी धोरण राबवण्याची भाषा करणाऱ्या तालिबान सरकारने आपले खरे रंग दाखवायला काही महिन्यांतच सुरुवात केली आणि देशातील नागरिकांची परिस्थिती बिकट होत गेली. 

कुठलाही सोहळा नाही

एखाद्या पक्षाचं सरकार सत्तेवर आल्यानंतर जेव्हा त्याला एक वर्ष पूर्ण होतं, तेव्हा कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाचं किंवा सोहळ्याचं आयोजन केलं जातं. मात्र तालिबान सरकारनं वर्षपूर्तीनिमित्त कुठलाही सोहळा आयोजित करणार नसल्याचं म्हटलं आहे. सरकारी टीव्ही वाहिनीवरून काही कार्यक्रम प्रसारित केले जाणार आहेत. ही गोष्ट वगळता सध्या कुठल्याही सेलिब्रेशनच्या मूडमध्ये तालिबान सरकार नसल्याचं चित्र आहे. तालिबाननं कितीही दावे केले असले तरी देशातील नागरिकांची परिस्थिती बिकट होत चालल्याचं चित्र आहे. 

गरीबीची लाट

अफगाणिस्तानमध्ये गेल्या वर्षभरात जणू गरिबीची लाटच आली आहे. काही संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार देशाच्या 3 कोटी 80 लाख लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या सध्या भयंकर गरिबीची सामना करत आहे. तालिबानच्या राजवटीनं महिलांसमोरील समस्या तर फारच वाढल्या आहेत. कडक तालिबानी नियम आता महिलांवर लादले जाणार नाहीत, असं आश्वासन सरकारनं दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात तसं घडताना दिसत नाही. काही महिन्यांतच कडक शरिया कायद्यानुसार महिलांच्या शिक्षणावर, फिऱण्यावर आणि सामाजिक अधिकारांवर बंधनं लादण्यात आली आहेत. 

अधिक वाचा - Bilkis Bano case: बिलकिस बानो बलात्कार प्रकरणी सर्व आरोपींची मुक्तता, १५ वर्षांपासून भोगत होते शिक्षा

शाळांमध्ये बंदी

मुलींच्या शिक्षणावर कुठलीही बंधनं लादली जाणार नाहीत, असं आश्वासन तालिबान सरकारनं दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात मुलींच्या माध्यमिक शिक्षणावर बंदी लादण्यात आली आहे. हजारो मुलींना माध्यमिक शाळेत येण्यास मनाई करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांना घरीच थांबण्याचा आणि लग्न कऱण्याचा सल्ला दिला जाऊ लागला आहे. मे महिन्यापासून महिलांसाठी नवा फतवा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार घरातून बाहेर पडताना बुरखा वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. तालिबान सरकार आल्यापासून आमचं आयुष्य बरबाद झाल्याची टीका महिला करत आहेत. 

अधिक वाचा - Crime News: हादरली राजधानी दिल्ली, घरात घुसून डबल मर्डर; सासू- सुनेवर चाकूनं वार

महिलांना मारहाण

महिलांच्या अधिकारांची पायमल्ली होत असल्याबद्दल महिलांनी शनिवारी मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र हा मोर्चा उधळून लावण्यात आला आणि त्यात सहभागी महिलांना अमानूष मारहाण करण्यात आली. एकीकडे आर्थिक संकट आणि दुसरीकडे तालिबानी निर्बंध या कात्रीत महिलांचं जगणं सर्वात आव्हानात्मक बनलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी