Jammu Kashmir: एकाच घरातून सापडले कुजलेल्या अवस्थेतले 6 मृतदेह, पोलीस गुंतले तपासात

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 17, 2022 | 11:18 IST

Six dead bodies found: जम्मूतील सिधरा (Sidhra) येथे एका घरात 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत. यामध्ये दोन पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे.

Jammu Kashmir
एकाच घरात आढळले 6 मृतदेह  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • जम्मूतील सिधरा (Sidhra) येथे एका घरात 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत.
  • हे सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
  • एकाच घरात राहणार्‍या या दोन कुटुंबातील सर्वांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

श्रीनगर: Six dead bodies found in Jammu Kashmir house: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) एकामागून एक घटना घडत आहेत. जम्मूतील सिधरा (Sidhra) येथे एका घरात 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत. यामध्ये दोन पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.  एकाच घरात राहणार्‍या या दोन कुटुंबातील सर्वांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र पोलीस विभागाने याबाबत काहीही स्पष्टपणे सांगितलेले नाही. 

दरम्यान सर्व मृतदेह जम्मू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या संदर्भात काही माहिती देता येईल, असे पोलिसांनी म्हटलं आहे. 

अधिक वाचा-  राज्यात रेल्वेचा मोठा अपघात, ट्रेनच्या धडकेत रूळावरून घसरले तीन डब्बे; सुदैवानं जीवितहानी टळली

नेमकी घटना काय? 

जम्मूतील सिधरा येथे एका घरात 6 संशयित मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. येथे एका घरात 6 मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आले. मृतांमध्ये एक महिला, तिच्या दोन मुली आणि दोन नातेवाईकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या लोकांचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

शकीना बेगम अशी महिलेची ओळख आहे. मृतांमध्ये शकीना स्वतः त्यानंतर तिच्या दोन मुली नसीमा अख्तर आणि रुबिना बानो, मुलगा जफर सलीम, तिचे दोन नातेवाईक नूर अल हबीब आणि सज्जाद अहमद यांचा मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे.

शेजारच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे घर नूर-उल-हबीबचे असल्याचे आहे, तर शकीना आणि तिचे कुटुंब घराची देखभाल करत होते. हे कुटुंब डोडा येथील रहिवासी आहे तर नूर उल हबीब श्रीनगरचा रहिवासी होता.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नूर मुख्य घरात तर सकीना आणि तिचे कुटुंबीय मागील खोल्यांमध्ये राहत होते. तीन ते चार दिवसांपासून कुटुंबातील सर्व सदस्य दिसत नसल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. आज सकाळी अचानक दुर्गंधी येऊ लागली. तपासात हे कुटुंब ज्या घरात राहत होते त्याच घरातून हा वास येत असल्याचे आढळून आले. शेजारी घराजवळ गेल्यावर दुर्गंधीचा वास आणखी येऊ लागला. त्यानंतर शेजारच्यांना  संशय आला आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना धक्काच बसला. तीन महिला आणि तीन पुरुषांसह दोन्ही कुटुंबातील सर्व सदस्यांचे कुजलेले मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पडलेले आढळून आले.

अधिक वाचा-  'या' चार राशींसाठी पुढचे 140 दिवस सुखाचा काळ, होईल कल्याण

एफएसएल टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरून नमुने गोळा केल्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जीएमसी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतदेह पूर्णपणे कुजले आहेत. त्यामुळे  आत्ताच काही सांगू शकत नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच याबाबत स्पष्टपणे काही सांगता येणार आहे.

याआधी मंगळवारी शोपियानमधील छोटीपोरा येथे दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या केली होती. या हल्ल्यात मृताचा भाऊही जखमी झाला आहे. सुनील कुमार भट्ट असे मृताचे नाव आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी