Gujarat: गुजरातमध्ये कार अपघातात ६ ठार, काँग्रेस आमदाराच्या जावयावर 'हिट अँड रन'चा आरोप

Six killed as car rams into auto rickshaw and motorbike in Anand district : गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील सोजित्रा तहसीलमधील डाली गावाजवळ कार अपघात झाला. अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला.

Six killed as car rams into auto rickshaw and motorbike in Anand district
गुजरातमध्ये कार अपघातात ६ ठार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • गुजरातमध्ये कार अपघातात ६ ठार
  • काँग्रेस आमदाराच्या जावयावर 'हिट अँड रन'चा आरोप
  • चौंघाचा घटनास्थळी तर दोघांचा हॉसप्टिलमध्ये मृत्यू

गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील सोजित्रा तहसीलमधील डाली गावाजवळ कार अपघात झाला. अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कार चालक पळून गेला. यामुळे अपघात प्रकरणी हिट अँड रनची केस झाली. गुजरातमधील काँग्रेस आमदार पूनम परमार यांचे जावई  केतन पढियार यांच्यावर आणंदमधील अपघात प्रकरणी हिट अँड रनचे आरोप होत आहे. ( Six killed as car rams into auto rickshaw and motorbike in Anand district )

कार चालकाने केलेल्या हलगर्जीपणामुळे कार, ऑटो आणि बाइक यांची टक्कर झाली. टक्कर झाल्यामुळे घटनास्थळीच चार जणांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या दोन जणांचा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ज्यांचा अपघाती मृत्यू झाला ते राखी पौर्णिमेचा सण साजरा करून परतत होते. घरी परतत असताना अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी अपघात प्रकरणी नोंद करून कायद्यानुसार कारवाई सुरू केली आहे. मृतांमध्ये मामाच्या घरी राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यासाठी गेलेल्या दोन बहिणी आणि त्यांचा आईचा समावेश आहे. आणंदचे सहायक पोलीस अधीक्षक अभिषेक गुप्ता यांनी अपघात प्रकरणी सविस्तर माहिती दिली. अपघातात ऑटोतील चार आणि बाइकवर बसलेल्या दोघांचा मृत्यू झाला. कार चालक जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी कार चालकावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती गु्प्ता यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी