Six people died due to suffocation: रात्रीच्या सुमारास घरात येणारे डास पळून जावे यासाठी अनेकजण घरात कॉईल्स लावतात. मात्र, याच कॉईलमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना आता समोर आली आहे. ही घटना पूर्व दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरातील आहे.
असं म्हटलं जात आहे की, रात्री झोपण्यापूर्वी या कुटुंबाने घरात डास मारणारी कॉईल लावली होती. ही कॉईल लावून कुटुंबातील सर्वजण झोपले. मात्र, कॉईलमुळे गादीने पेट घेतला आणि घरात आग लागली. घरात आग लागल्याने प्रचंड धूर सुद्धा होता. या धुरात गुदमरुन सहा जणांचा मृत्यू झाला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी घरात एकूण आठ जण होते.
वाचा : आयपीएलचा महासंग्राम; कधी, कुठे आणि कोणत्या टीम्सची मॅच, पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् LIVE Streaming
Six people including a toddler died & two people are critical due to suffocation as a result of a fire caused due to burning mosquito repellant. Further investigation is underway: Additional DCP Sandhya Swamy at Shastri Park, Delhi pic.twitter.com/7bGw0tlHoQ — ANI (@ANI) March 31, 2023
या घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका दाखल झाले. मात्र, तोपर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये एका दीड वर्षीय मुलाचा सुद्धा समावेश आहे आणि एका महिलेचाही समावेश आहे. या घटनेत दोघेजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे पण वाचा : ही पेय करतात तुमची किडनी डिटॉक्स
शेजारील नागरिकांनी सांगितले की, डास मारणारी कॉईल लावल्याने घरात आग लागली. हे घर पाचव्या मजल्यावर आहे. या घरात जवळपास 30 खोल्या आहेत. घर मालकासह कुटुंबातील एकूण 35 जण या ठिकाणी राहतात.
हे पण वाचा : IPL 2023: कधी, कुठे आणि कोणाची मॅच, पाहा संपूर्ण वेळापत्रक
जिल्हा पोलीस उपायुक्तांनी मृतकांच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. घरात आठ जण आढळून आले. या सर्वांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, सहा जणांचा मृत्यू झाला होता. इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.