'या' गावातील प्रत्येक व्यक्ती कमवते ३२ लाख, मात्र तरीही घालत नाही कपडे, कारण...

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 08, 2021 | 14:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

हर्टफोर्डशायरचे दरडोई उत्पन्न आहे ४६,६०० डॉलर. जपानचे हायलॅंड्स आईसलॅंड, फ्रान्सचे वार्कविकशायर आणि न्यूझीलंडचे ईस्टर्न स्कॉटलंड यांच्यापेक्षाही अधिक उत्पन्न.

City with $46,600per capita, ahead of many rich countries
श्रीमंत देशांपेक्षाही अधिक दरडोई उत्पन्न असलेले शहर 

थोडं पण कामाचं

  • शहराचे दरडोई उत्पन्न ४६,६०० डॉलर
  • रुपयांमध्ये नागरिकांचे दरडोई उत्पन्न ३२.६२ लाख रुपये
  • इंग्लंडमधील अनेक नामांकित कंपन्यांची या शहरात कार्यालये

लंडन : कोणत्याही देशाच्या किंवा राज्य, शहर यांच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल जाणण्याचा पहिला निकष तेथील नागरिकांचे दरडोई उत्पन्न हा असतो. युनायटेड किंगडममधी हर्टफोर्डशायरमधील एक गाव असे आहे की जेथील दरडोई उत्पन्न हे जपान आणि फ्रान्ससारख्या देशांपेक्षाही जास्त आहे. एक लाख लोकसंख्या असलेले हर्टफोर्डशायर हे असेच गाव आहे. येथील दरडोई उत्पन्न जवळपास ४६,६०० डॉलर इतके आहे. भारतीय चलनाचा विचार करता हर्टफोर्डशायर येथील प्रत्येक व्यक्ती जवळपास ३२.६२ लाख रुपये कमावतो. मात्र या गावाचे वैशिष्ट्य असे की येथील लोक कपडे घालत नाहीत. यामागचे कारण काय आणि जपान, फ्रान्स, यूएईपेक्षाही येथील नागरिकांचे उत्पन्न जास्त का आहे ? हे जाणून घेऊया...

हर्टफोर्डशायर येथील दरडोई उत्पन्न ४६,६०० डॉलर इतके आहे. जपान, फ्रान्स, न्यूझीलंड आणि यूएई येथील श्रीमंत शहरांपेक्षाही हर्टफोर्डशायरचे दरडोई उत्पन्न जास्त आहे. इटली, कुवेत, ब्रुनेईसारख्या देशांमधील नागरिकांचे दरडोई उत्पन्नदेखील हर्टफोर्डशायरपेक्षा कमी आहे.

यामागचे कारण काय?


हर्टफोर्डशायरची लोकसंख्या जवळपास ११.९० लाख इतकी आहे. हे गाव १९२९मध्ये वसवण्यात आले होते. तेव्हापासूनच या गावातील नागरिकांनी एक निर्णय घेतला होता. तो म्हणजे जोपर्यत विशेष अशी आवश्यक नसल्यास कपडे परिधान करायचे नाहीत. जगाच्या झगमगाटापासून दूर राहणे हे या निर्णयामागचे कारण सांगितले जाते. अर्थातच काही खास प्रसंगाच्या वेळेस येथील नागरिक कपडे परिधान करत असतात.

अर्थव्यवस्थेतील हर्टफोर्डशायरचे योगदान


अर्थव्यवस्थेचा विचार करता कृषी, इंडस्ट्री, सेवा क्षेत्र या तिन्ही क्षेत्रात हर्टफोर्डशायरने चांगली प्रगती केली आहे. एका आकडेवारीनुसार १९९५ मध्ये जीव्हीडी म्हणजेच ग्रॉस व्हॅल्यू अॅडेडचे गुणोत्तर ११,७४२ इतके होते. तेच २००३ मध्ये वाढून २०,९३७ वर पोचले होते. आताही त्यात वाढ होते आहे. या छोट्याशा शहरात इंग्लंडमधील अनेक प्रसिद्ध कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे येथील लोकांना मोठ्या प्रमाणात चांगला रोजगार मिळाला आहे. इतके नव्हे या शहरात इंग्लंडमधील सर्वात मोठी फार्मा असोसिएशन एनपीएचा मोठा व्यवसाय आहे. यामुळे येथील नागरिकांना औषध निर्माण म्हणजे फार्मा क्षेत्रातही रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. नागरिकांचे उत्पन्न आणि येथील आर्थिक व्यवहारांची आकडेवारी यासंदर्भात हे छोटेसे शहर इतरांसाठी एक उदाहरण आहे. त्याचबरोबर येथील नागरिकांनी कपडे परिधान न करणे हेदेखील जगाच्या दृष्टीने या शहराचे एक निराळेच वैशिष्ट्य आहे. आपल्या या वैशिष्ट्यांमुळे हर्टफोर्डशायरने जगाचे लक्ष वेधून घेतलेले आहे.

हर्टफोर्डशायर - 


१. शहराचे दरडोई उत्पन्न ४६,६०० डॉलर
२. रुपयांमध्ये नागरिकांचे दरडोई उत्पन्न ३२.६२ लाख रुपये
३. इंग्लंडमधील अनेक नामांकित कंपन्यांची या शहरात कार्यालये
४. फार्मा क्षेत्रातील मोठी उलाढाल
५. कृषी, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातही या शहराची मोठी प्रगती
६. येथील नागरिकांची काही खास प्रसंग वगळता कपडे न घालण्याची परंपरा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी