अनेक वर्षांपूर्वीचे स्मृती इराणींनी सांगितले सत्य, म्हणाल्या- "गर्भपातानंतर शिकला मानवतेचा धडा"

लोकल ते ग्लोबल
Updated Mar 26, 2023 | 20:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

स्मृति इराणी या भारताच्या वस्त्रोद्योग मंत्री आणि महिला व बालविकास मंत्री पदावर सध्या कार्यरत आहेत. टेलिव्हिजन अभिनेत्री ते केबिनेट मंत्री पर्यंतच्या त्यांच्या या प्रवासात अनेक चढ-उतार आले, ज्यामधील एका गोष्टीचा खुलासा त्यांनी नुकताच केला. 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या शूटिंगदरम्यान त्या गरोदर राहिल्या होत्या, त्यादरम्यान त्यांची तब्येत खूप बिघडली असल्याकारणामुळे त्या शूटिंगला येऊ शकल्या नव्हत्या, पण तरीही त्यांना गर्भपाताची कागदपत्रे निर्मात्याला दाखवावी लागली होती.  

स्मृती इराणी सांगतात की,
अनेक वर्षांपूर्वीचे स्मृती इराणींनी सांगितले कटू सत्य  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • स्मृती इराणी ने सांगितले अनेक वर्षापूर्वीचे कटू सत्य
  • म्हणाल्या- "गर्भपातानंतर शिकला मानवतेचा धडा"

Smriti Irani disclosed a truth after years एकेकाळी हिन्दी मालिका विश्वात सुप्रसिद्ध ठरलेली अभिनेत्री ते यशस्वी राजकारणी पर्यंतचा स्मृती इराणीचा प्रवास सर्वश्रुत आहे. 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून देशाच्या प्रत्येक घराघरात पोहोचलेल्या स्मृती इराणी आज एक यशस्वी राजकीय व्यक्तिमत्व म्हणून देशात प्रसिद्ध आहेत.

प्रसिद्ध राजकिय व्यक्तिमत्व असलेल्या स्मृति इराणी, एकेकाळी हिन्दी टेलिव्हिजन विश्वात 'सास भी कभी बहू थी' या मालिकेतील 'तुलसी' ची व्यक्तिरेखा साकारत होत्या. ही मालिका खूप हीट झाली होती. मात्र या मालिकेदरम्यानचा किस्सा स्मृति इराणी यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितला. 

अधिक वाचा : ​Rakesh Roshal Video : करण अर्जुन चित्रपटाचे नाव होते 'कायनात', सलमान च्या जागी होता अजय देवगण, राकेश रोशन ने केला खुलासा

स्मृति इराणी यांनी सांगितले की, शूटिंगदरम्यान त्यांची तब्येत खूप बिघडली होती. त्यामुळे त्या सेट वर जाऊ शकत नव्हत्या. मात्र मालिकेची निर्माती एकता कपूर ने त्यांना शूटिंगला येण्यास सांगितले. अशावेळी स्मृति इराणी यांनी त्यांचा गर्भपात झाल्याचे एकता यांना सांगितले होते, त्यानंतरही त्यांना त्यांच्यासमोर गर्भपात झाल्याचे पुरावे सादर करावे लागले होते. 

स्मृती इराणी यांनी सांगितले की, तुलसीच्या पात्राने त्यांना खूप प्रसिद्दी मिळाली. या मालिकेतून त्या भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचल्या. तुलसीनंतर त्या रामायण मध्ये देखील दिसून आल्या होत्या, रामायण मध्ये त्यांनी लक्ष्मी आणि सीता माँ ची भूमिका केली होती. यादरम्यान त्या गरोदर राहिल्या आणि याची कल्पना त्यांना नव्हती. त्याचवेळी ऐन कामात त्यांची तब्येत खूप बिघडली, जेव्हा त्या डॉक्टरांकडे गेल्या त्यावेळी त्यांना आपण गरोदर असल्याची कल्पना आली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

अधिक वाचा : ​Weather Update | मुंबईसह 'या' जिल्ह्यात पुन्हा पाऊस पडणार? जाणून घ्या या आठवड्यातील हवामानाची स्थिती

स्मृती इराणी यांनी सांगितले की, "शूटिंगदरम्यान माझी अचानक तब्येत बिघडली, मात्र शूटिंग पूर्ण केल्यानंतरच घरी जाण्याची परवानगी मिळाली होती. त्यामुळे पूर्ण शूटिंग केल्यानंतर जेव्हा मी घरी गेले तेव्हा मला प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाला. मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले त्यावेळी भरपूर पाऊस पडत होता. त्यावेळी तिकडची नर्स ऑटोग्राफसाठी माझ्या मागे लागली, मला रक्तस्त्राव होत होता, मी एडमीट करून घ्या असे सांगितले. तेव्हा काय मला आतमध्ये जाता आले, आणि त्यावेळी गर्भपात झाल्याचे मला कळले."

स्मृती इराणी यांना यानंतरही कामावर परतण्यास सांगितले होते. त्या सांगतात "त्यादरम्यान, रामायणातली काही पात्र अशीच रिकामी फिरत होती, तसेच तुलसीशिवाय आणखीन पन्नास पात्र मालिकेत होते, तरीही निर्मात्याला मलाच शूटसाठी बोलवायच होतं!" स्मृती जेव्हा शूटसाठी पुन्हा गेल्या त्यावेळी त्यांना, त्यांच्या अनुपस्थितीबद्दल नाटक केले असल्याचे सूनावण्यात आले होते. त्यावेळी स्मृती इराणी यांनी गर्भपाताची सर्व कागदपत्रे एकता कपूरला पाठवली. स्मृती इराणी सांगतात की, "गर्भपातानंतर मला मानवतेचा धडा मिळाला होता."   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी