साप चावला म्हणून रागाच्या भरात त्याने सापाचे तोंडाने केले तुकडे

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 29, 2019 | 16:10 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

उत्तर प्रदेशातील ऐटामध्ये एका तरुणाने सापाला चावले आणि त्याचे तुकडे तुकडे केले. यानंतर त्याची स्थिती अत्यंत नाजूक आहे. हे प्रकरण ऐकून प्रत्येक जण हैराण झाला.

snake bite
साप  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • सापाने केले दंश
  • रागाने सापाचाच घेतला चावा
  • रागाच्या भरात केले तुकडे तुकडे

ऐटा: रागाच्या भरात कोण काय करेल हे कधी सांगता येत नाही. रागाच्या भरात कोणतेही कृत्य करताना माणूस मागचा पुढचा विचार करत नाही. कृत्य घडल्यानंतर अखेर पश्चाताप करण्याची वेळ येते. मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो. त्यामुळे रागाला वेळीच आवर घालून आपण जे करत आहोत त्याकडे लक्ष दिले पाहिजे ज्यामुळे पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील ऐटा येथे घडली आहे. 

ही अजब घटना ऐकून सारेच हैराण झाले. या ठिकाणी एका सापाने एका व्यक्तीचा चावा घेतला. साप आपल्याला चावला याचा राग त्या व्यक्तीला आला. या रागातच त्याने सापासोबत जे काही केले ते तुम्ही यापूर्वी कधीच ऐकले नसेल. हे वाचून तुम्हालाही धक्का बसेल. या व्यक्तीने रागाने चावलेल्या सापाचे तोंडाने तुकडे तुकडे केले. 

सापाला चावल्यानंतर तो व्यक्ती बेशुद्ध झाला. राजकुमारचे वडील बाबू राम यांनी माडियाला दिलेल्या माहितीनुसार, माझा मुलगा दारूच्या नशेत होता.  एक साप आमच्या घरात घुसला आणि तो माझ्या मुलाला चावला. साप चावल्याने माझा मुलगा खूप संतापला. त्याने रागात येऊन त्या सापाचे तुकडे तुकडे केले तेही तोंडाने. त्याची स्थिती गंभीर आहे. त्याच्यावर उपचाराच्या खर्चासाठी आमच्याकडे तितके पैसे नाहीत. 

डॉक्टरांनीही सांगितले की या व्यक्तीची स्थिती अत्यंत नाजूक आहे. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की एक आजारी रुग्ण माझ्याकडे आला आणि त्याने सांगितले की तो सापाला चावला आहे. मी कन्फ्यूज झालो आणि सापाने त्याला चावले असे मला वाटले. त्याला दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. राजकुमारच्या कुटुंबियांनी त्या सापाला जमिनीत पुरुन टाकले. 

याआधीही अशीच एक घटना वडोदऱ्यात घडली होती. गुजरातच्या महिसागर जिल्ह्यात सापाने एका वृद्धाला दंश केला त्यानंतर या वृद्धाने त्या सापाचा चावा घेतला. महिसागर जिल्ह्यात एख ७० वर्षीय वृद्ध व्यक्ती आपल्या शेतात काम करत होते. यावेळी काम करत असताना एका सापाने त्यांना दंश केला. मात्र यामुळे ते घाबरले नाहीत तर त्यांनी सापावरच हल्ला केला आणि त्याचा चावा घेतला. दरम्यान, या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.  

टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले होते. जी बैरिया असं या व्यक्तीचे नाव होते. सापाने त्यांना दंश केल्याने तसेच त्यांनीही नंतर सापाचा चावा घेतल्याने त्यांच्या संपूर्ण शरीरात विष पसरले होते. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
साप चावला म्हणून रागाच्या भरात त्याने सापाचे तोंडाने केले तुकडे Description: उत्तर प्रदेशातील ऐटामध्ये एका तरुणाने सापाला चावले आणि त्याचे तुकडे तुकडे केले. यानंतर त्याची स्थिती अत्यंत नाजूक आहे. हे प्रकरण ऐकून प्रत्येक जण हैराण झाला.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...