Pakistan Snowfall : बर्फवृष्टीमुळे 23 लोकांचा मृत्यू, पाकचे मंत्री म्हणतात लोकांनीही आपली अक्कल वापरावी

उत्तर पाकिस्तानमध्ये (North Pakistan) बर्फवृष्टीमुळे (Snowfall ) वाहनांमध्ये अडकून सुमारे 23 पर्यटकांचा (Tourists) मृत्यू झाला. पंजाब (Punjab) प्रांतातील रावळपिंडीमधील (Rawalpindi) मुरी (Muri) शहरात मोठ्या संख्येने पर्यटक पोहोचले होते आणि त्याच दरम्यान तेथे जोरदार बर्फवृष्टी सुरू झाल्याने तेथे वाहनांसह पर्यटक अडकले आणि प्रशासन हतबल झाले.

Fawad Chaudhary
फवाद चौधरी   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • इस्लामाबादपासून 64 किमी ईशान्येस असलेल्या मुरीला आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित
  • मुरी येथे झालेल्या हिमवृष्टीमुळे 23 जणांना जीव गमवावा लागला.
  • बळी गेलेल्या 23 पर्यटकांमध्ये एका 4 वर्षांच्या मुलीचाही समावेश

Pakistan Murree Snowfall : नवी दिल्ली :  उत्तर पाकिस्तानमध्ये (North Pakistan) बर्फवृष्टीमुळे (Snowfall ) वाहनांमध्ये अडकून सुमारे 23 पर्यटकांचा (Tourists) मृत्यू झाला. पंजाब (Punjab) प्रांतातील रावळपिंडीमधील (Rawalpindi) मुरी (Muri) शहरात मोठ्या संख्येने पर्यटक पोहोचले होते आणि त्याच दरम्यान तेथे जोरदार बर्फवृष्टी सुरू झाल्याने तेथे वाहनांसह पर्यटक अडकले आणि प्रशासन हतबल झाले. या पाकिस्तानातील प्रसिद्ध हिल पर्यटन स्थळ (Hill tourist destination) मुरी येथे झालेल्या हिमवृष्टीमुळे 23 जणांना आपला जीव गमवावा लागला. पण यावर दु: ख व्यक्त न करता पाकिस्तानचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री (Union Information and Broadcasting Minister) फवाद चौधरी (Fawad Chaudhary) यांनी या घटनेबाबत अत्यंत लज्जास्पद वक्तव्य केले.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने राजधानी इस्लामाबादपासून 64 किमी ईशान्येस असलेल्या मुरीला आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. कारण तेथे अजूनही अनेक वाहने अडकून पडली आहेत. मुरी येथे बळी गेलेल्या 23 पर्यटकांमध्ये एका 4 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. 
मंत्री फवाद चौधरी काय म्हणाले 

पाकिस्तानी वृत्तवाहिनी 'समा'शी बोलताना फवाद चौधरी म्हणाले की, ''सरकार आणि प्रशासन अडकलेल्या लोकांसाठी काहीही करू शकत नाही, लोकांनीही आपली अक्कल वापरावी.'' पाकिस्तान सरकारची लाचारी एवढी आहे की, या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त करण्याऐवजी त्यांनी मृतांची खिल्ली उडवणारे लज्जास्पद विधान केले. पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी म्हणाले की, ''जर तुम्हाला जिवंत रहायचे असेल तर घरीच राहा, इतका खर्च करण्यापेक्षा तुम्हाला बर्फाचा आनंद घ्यायचा असेल, तर लोक घरी स्नो स्प्रे खरेदी करा आणि एकमेकांवर फवारा. यासाठी प्रशासन नाही, तुमची अक्कलही वापरली पाहिजे.''


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी