ज्या चीनमधून कोरोना व्हायरस आला तिथं आतापर्यंत फक्त 'एवढ्याच' लोकांना लागण

ज्या चीनमधून कोरोनाचा प्रसार झाला तिथे आतापर्यंत फक्त ८५ हजार जणांनाच कोरोनाची लागण झाली आहे. इतर अनेक देशांच्या तुलनेत हा आकडा फारच अत्यल्प आहे.

China corona patients
चीन कोरोना रुग्ण 

थोडं पण कामाचं

  • चीनमध्ये आतापर्यंत फक्त ८५ हजार जणांनाच कोरोनाची लागण
  • चीनमध्ये आजच्या घडीला फक्त १८५ अॅक्टिव्ह रुग्ण
  • चीनमध्ये आजवर ४६३४ जणांचा मृत्यू झाला आहे

मुंबई: कोव्हिड-१९ (Covid-19) या साथीच्या रोगाने आजच्या घडीला संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. संपूर्ण जगात कोट्यवधी लोकांना याची लागण झाली आहे. ज्याचा सर्वाधिक फटका अमेरिका, भारत, ब्राझील आणि रशिया या देशांना प्रामुख्याने बसला आहे. आजपर्यंत अमेरिकेत तब्बल ७३ लाख, भारतात ६० लाख, ब्राझिल ४७ लाख आणि रशियात ११ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. एकीकडे रशियाने कोरोनावरील लस आल्याचा दावा केलेला असला तरीही जागतिक स्तरावर याबाबत अद्यापही संभ्रमता आहे. त्यामुळे अद्यापही म्हणावं तसं या रोगावर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. दरम्यान, या सगळ्याची ज्या देशातून सुरुवात झाली तिथे मात्र फारच कमी लोकांना याची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

कोरोना व्हायरस या रोगाची सुरुवात सर्वप्रथम चीनमधून (China) झाली होती. पण आतापर्यंत इथली रुग्णसंख्या इतर देशांच्या तुलनेने फारच नगण्य आहे. आधीच चीनविषयी अनेक देशांमध्ये संशयाचं वातावरण आहे. त्यात अद्यापही जागतिक स्तरावर कोणतीही शाश्वत अशी लस आलेली नसली तरीही चीनसारख्या प्रचंड मोठी लोकसंख्या असलेल्या देशाने रुग्णसंख्येवर एवढ्या मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवलं कसं याबाबत अद्यापही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

ज्या चीनमधून कोरोना व्हायरसची सुरुवात झाली तोच चीन आज कोरोना रुग्णांच्या जागतिक क्रमवारीत थेट ४४व्या स्थानी आहे. या क्रमवारीत अमेरिका पहिल्या स्थानी आणि भारत दुसऱ्या स्थानी आहे. पण भारताहून जास्त लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये फक्त ८५ हजार जणांनाच कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये जवळजवळ दीड कोटींच्या आसपास लोकांना लागण झाली होती. पण चीनमध्ये फक्त ८५ हजार लोकांना झालेली लागण यावरुन आता काहीसा संशय व्यक्त केला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये आतापर्यंत फक्त ८५,३७२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यापैकी ४६३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ८०,५५३ जण या जीवघेण्या आजारातून बरे झाले आहेत. तर आजच्या घडीला फक्त १८५ रुग्णांवर उपचार (Active Cases) सुरु आहेत. चीनच्या तुलनेत भारत आणि अमेरिकेत मात्र फारच गंभीर परिस्थिती आहे. एक नजर अमेरिका आणि भारतातील कोरोना रुग्णसंख्येवर                            

देश एकूण रुग्ण एकूण मृत्यू बरे झालेले रुग्ण अॅक्टिव्ह रुग्ण
अमेरिका ७,३२१,३४३ २०९,४५३  ४,५६०,४५६ २,५५१,४३४ 
भारत  ६,०७४,७०२ ९५,५७४ ५,०१६,५२० ९,६२,६०८

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी