तर या वर्षीच मारला गेला असता दाऊद इब्राहिम, या व्यक्तीमुळे वाचला

Underworld don Dawood Ibrahim च्या शोधात भारत आजही आहे. पण २२ वर्षांपूर्वी त्याचा किस्साच संपला असता जर नेपाळच्या खासदाराने त्याला मारण्याचा प्लानबाबत माहिती दिली नसती. 

so underworld don dawood ibrahim would have been killed in 1998 because of this man escaped crime news in marathi
तर या वर्षीच मारला गेला असता दाऊद इब्राहिम, या व्यक्तीमुळे वाचला  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • १९९८ मध्ये दाऊद इब्राहिमला मारण्यासाठी बनविला होता प्लान, एजाज लकडावालाच्या चौकशीत झाला खुलासा 
  • कराचीच्या दर्गात मारण्याची होती योजना, अखेरच्या क्षणी त्याला मिळाली माहिती 
  • नेपाळचा खासदार मिर्जा दिलाशाद बेगने दाऊला या कटाची दिली होती माहिती 

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारताचा मोस्ट वॉटेड ज्याला पाकिस्तानने आपल्या देशात लपवून ठेवले आहे. दाऊदच्या मुद्यावर भारतात अनेकदा राजकारण होते. ९३ च्या मुंबई बॉम्ब ब्लास्टचा सूत्रधार दाऊदला भारतात आणण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. पण अजूनही त्याला यश आले नाही. यात दाऊदचा विश्वासू सहकारी असलेल्या एजाज लकडावाला याने एक धक्कादायक माहिती दिली आहे. एजाज लकडावाला याला ८ जानेवारीला पाटण्यात अटक करण्यात आली होती.  त्याने केलेल्या दाव्यानुसार दाऊदचा किस्सा १९९८ मध्ये संपला असता. पण अखेरच्या क्षणी तो वाचला. 

१९९८ मध्ये दाऊदला मारण्याचा प्लान 

एजाज लकडावालाने  चौकशीत सांगितले की, १९९८ मध्ये कराचीमधील एका दर्ग्यात दाऊला मारण्याचा प्लान होता. पण त्याला त्याचा सुगावा लागला आणि नशिबाने तो तेथून निसटण्यास यशस्वी झाला. दाऊदला मारण्याची जबाबदारी छोटा राजनने विक्की मेहरोत्राला दिली होती. पण नेपाळचा खासदार मिर्जा दिलशाद बेग यांच्या मार्फत दाऊदला त्याची भनक लागली होती. त्यामुळे तो दर्ग्यात गेलाच नाही. त्याची मुलगी मारियाच्या मृत्यूनंतर तो दर्ग्यात जाणार होता. 

एजाज लकडावालाने सांगितले की मिर्जा दिलशाद बेग याच्या या कृतीमुळे छोटा राजन खूप नाराज झाला होता.  त्यानंतर त्याने मिर्जा दिलशाद बेग याची हत्या केली होती. 

मिर्जा दिलशाद बेगने दाऊदला दिली माहिती 

एजाज लकडावालाने चौकशीत सांगितले की,  दाऊदला मारण्याची जबाबदारी छोटा राजनने आपला खास पंटर विक्की मेहरोत्राला दिली होती. या प्लानला अंतीम रूप देण्यासाठी १० जणांची खास टीम बनवली होती.   या टीममध्ये एजाज लकडावाला समेत विनोट माटकर, संजय घाटे, बाबा रेड्डी आणि फरीद तनाशा, बाळू डोकरे सामील होते. एजाजनुसार मुंबई बॉम्ब स्फोटानंतर दाऊद आणि छोटा राजन यांच्यात वाद वाढला होता. छोटा राजनला खात्री पटली होती की आता दाऊदचा अजेंडा बदलला आहे. आता त्याची लढाई देशातील बहुसंख्याक लोकांसह भारताविरूद्धही आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...