सोशल मीडिया दहशतवाद्यांशी जुडणारा दुवा; ट्विटरवर 70 हजार अ‍ॅक्टिव्ह अकाउंट, अन् संघटनांमध्ये होतेय 40% भरती

सोशल मीडिया (social media) हे दूर असलेल्या आपल्या जवळच्या व्यक्तींना जवळ करण्याचं साधन आहे, असं म्हटलं जातं. परंतु या साधनाचा उपयोग आता विघातक कृत्यांसाठी केला जात आहे. दहशतवादी संघटनांसाठी (Terrorist organizations) सोशल मीडिया सर्वात मोठे हत्या बनले आहे. सोशल मीडियावर कमी वयातील युझर्सला लक्ष्य करत त्यांना दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त केलं जात आहे. एका अहवालानुसार जगाच्या 8 अब्ज लोकसंख्येपैकी 4 अब्ज लोकसंख्या (Population) सोशल मीडिया वापरत आहे, त्यातील 30 टक्के युझर्स हे 30 वयापेक्षा कमी आहेत

Terrorists are recruited and funded through social media
सोशल मीडियाद्वारे दहशतावाद्यांची भरती अन् मिळवला जातोय निधी  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • ट्विटरवर आयएसचे सुमारे 70 हजार अॅक्टिव्ह अकाउंट आहेत आणि प्रत्येकाचे किमान एक-एक हजार फॉलोअर्स आहेत.
  • विश्व दहशतवाद निर्देशांक 2022 नुसार जगभरात 2021 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 29% बळींसाठी केवळ आयएस जबाबदार
  • अहवालानुसार फेसबुकवर आयएसचे 96 देशांमध्ये 1000 अकाउंट आहेत.

नवी दिल्ली : सोशल मीडिया (social media) हे दूर असलेल्या आपल्या जवळच्या व्यक्तींना जवळ करण्याचं साधन आहे, असं म्हटलं जातं. परंतु या साधनाचा उपयोग आता विघातक कृत्यांसाठी केला जात आहे. दहशतवादी संघटनांसाठी (Terrorist organizations) सोशल मीडिया सर्वात मोठे हत्या बनले आहे. सोशल मीडियावर कमी वयातील युझर्सला लक्ष्य करत त्यांना दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त केलं जात आहे. एका अहवालानुसार जगाच्या 8 अब्ज लोकसंख्येपैकी 4 अब्ज लोकसंख्या (Population) सोशल मीडिया वापरत आहे, त्यातील 30 टक्के युझर्स हे 30 वयापेक्षा कमी आहेत. 

दरम्यान,  ब्रुकिंग सेंटर फॉर मिडिल ईस्ट पॉलिसीने आपल्या अहवालातून दहशतवादी संघटनांविषयी मोठा धक्कादायक खुलासा केला आहे. ब्रुकिंग सेंटर फॉर मिडिल ईस्ट पॉलिसीच्या अहवालानुसार, ट्विटरवर आयएसचे सुमारे 70 हजार अॅक्टिव्ह अकाउंट आहेत आणि प्रत्येकाचे किमान एक-एक हजार फॉलोअर्स आहेत. या हिशेबाने सुमारे 7 कोटी लोक एकट्या आयएसशी जोडले गेले आहेत. याविषयीचे वृत्त मराठी वृत्त संस्था दिव्य मराठीने दिले आहे.  तर विश्व दहशतवाद निर्देशांक 2022 नुसार जगभरात 2021 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 29% बळींसाठी केवळ आयएस जबाबदार आहे. आयएसमध्ये 40% परदेशी दहशतवाद्यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून भरती झाली आहे.

Read Also : कोरोनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा विक्रम

2018 मधील एका संशोधन अहवालानुसार फेसबुकवर आयएसचे 96 देशांमध्ये 1000 अकाउंट आहेत. मोबाईलवर बॉम्बहल्ल्यांचे व्हिडिओ बनवून िट्वटरवर अपलोड करत तालिबानी दहशतवादीही भरती आणि संघटनेसाठी निधी मिळत आहेत. यूके टाइम्सच्या अहवालानुसार तर यू ट्यूब, फेसबुक, व्हॉट््सअॅप आणि टेलिग्रामवर व्हिडिओ अपलोड करून मर्सिडीजसारख्या बड्या कंपन्यांच्या जाहिरातींच्या महसुलातून दरमहा कोट्यवधी रुपयांची कमाई करीत आहेत.
फेब्रु. 2020 मध्ये अमेरिकी कंपनी ब्लॅकबर्डने केलेल्या केस स्टडीनुसार सोशल मीडियावर 47 विविध भाषांमध्ये दहशतवादी कारवायांना उत्तेजन देणारे 9,27,908 ट्वीट टाकण्यात आले होते.

Read Also : मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा

मार्च 2019 मध्ये ख्राइस्टचर्च येथे फेसबुकवर लाइव्ह स्ट्रीमिंग करीत 51 नागरिकांची हत्या करण्यात आली. तसेच यावर्षी उदयपूरला टेलरचा शिरच्छेद करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून लोकांना भडकाविण्याचा प्रयत्न झाला.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी