Solar Storm: आज पृथ्वीवर वादळ धडकणार? सॅटेलाईट्सला धोका, जगभरात black out होण्याची शक्यता

solar storm may hits earth: सोलार स्टोर्म म्हणजेच सौर वादळ आज पृथ्वीवर धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • सौर वादळामुळे मोबाइल सिग्नल यंत्रणा होऊ शकते ठप्प
  • सौर वादळामुळे जगभरातील वीज पुरवठा होऊ शकतो बंद

Solar storm updates: सूर्यमाला हा शास्त्रज्ञ आणि अवकाश संशोधकांसाठी नेहमीच एक शोधाचा विषय राहिला आहे. सौर वादळ पृथ्वीवर धडकणआर असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अवकाश शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. सौर वादळामुळे पृथ्वीवर मोठा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. नुकतेच अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने एक इशारा देत म्हटलं होतं की, सूर्यात होणारे स्फोट हे २०२५ पर्यंत सुरू राहतील. यामुळे उपग्रह आणि अंतराळवीरांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही तर वीजेवरही परिणाम होऊ शकतो. (solar storm may hits earth today august 3 possibility of blackout)

आज म्हणजेच ३ ऑगस्ट रोजी सौर वादळाचा परिणाम पृथ्वीवर होऊ शकतो. सौर वादळ हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला धडकू शकतं. असं म्हटलं जात आहे की, सौर वादळ हे सूर्याला धडकण्यापासून वाचले आहे. मात्र, आता हे वादळ वेगाने पृथ्वीच्या दिशेने वाटचाल करत आहे. तज्ज्ञांच्या मते, जर हे सौर वादळ पृथ्वीवर आदळले तर त्यामुळे संपूर्ण जगभरात अंधार होऊ शकतो.

अधिक वाचा : OMG: या ठिकाणी सापडला दुर्मिळ गुलाबी हिरा, 300 वर्षांत प्रथमच दिसला एवढा मोठा हिरा

ब्लॅकआऊट सोबतच इतरही धोके

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा सौर वादळ पृथ्वीवर धडकेल तेव्हा केवळ जगभरात ब्लॅक आऊटचा धोका नाहीये तर त्यासोबतच इतरही प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सौर वादळ पृथ्वीवर धडकले तर, जगभरातील रेडिओ सिग्नलवर त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे रेडिओच्या ऑपरेशनमध्ये अनेक समस्या उद्भवू शकतात.

तसेच याचा परिणाम जीपीएसच्या वापरावरही पडण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, याचा सर्वाधिक परिणाण हा मोबाइल फोनच्या सिग्नलवर पडू शकतो. ज्यामुळे जगभरातील मोबाइल नेटवर्क प्रणाली ठप्प पडू शकते.

सौर वादळ असतं तरी काय? 

सौर वादळाला जिओमॅग्नेटिक स्टॉर्म किंवा सोलर स्टॉर्म असंही म्हटलं जातं. हे सूर्यातून निघालेलं एका प्रकारचं रेडिएशन असतं. याच्यामुळे मॅग्नेटिक रेडिएशन आणि उष्णता वाढते. जे पृथ्वीवर पोहोचण्यास १५ ते १८ तासांचा कालावधी लागतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी