Shocking!वडील ओरडले म्हणून केली हत्या, क्राईम पेट्रोल पाहून नष्ट केले पुरावे

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 29, 2020 | 13:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mathura crime news: मथुरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका १७ वर्षाच्या मुलाने वडील ओरडले म्हणून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर क्राईम पेट्रोल शो पाहून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला

murder
वडील ओरडल्याने केली हत्या, सीरियल पाहून नष्ट केले पुरावे 

थोडं पण कामाचं

  • मथुरामध्ये १७ वर्षीय मुलाचे धक्कादायक कृत्य
  • ओरडले म्हणून केली वडिलांची हत्या
  • क्राईम पेट्रोल पाहून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

मथुरा: उत्तर प्रदेशच्या मथुरा(mathura in uttar pradesh) येथे खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका १७ वर्षाच्या किशोरवयीन मुलाने आपल्या वडिलांची हत्या(son killed father) केली आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आपल्या आईसोबत मिळून मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने क्राईम पेट्रोल या शोमधून काही युक्त्या मिळवल्या. घटनेच्या ५ महिन्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. 

ही घटना मथुरा येथील आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात आली असून त्यांचे नाव मनोज मिश्र असे आहे. पोलिसांनी याप्रकरणी बुधवारी आरोपी मुलाला अटक केली. हा १२वीचा विद्यार्थी आहे. त्याच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता पोलिसांना आढळले की त्याने टीव्ही शो क्राईम पेट्रोल १००हून अधिक वेळा पाहिला होता. 

क्षुल्लक ओरडण्यावरून केली वडिलांची हत्या

आरोपीने हे कृत्य २ मेला केले होते. वडील त्याला ओरडले म्हणून त्याने वडिलांची हत्या केली. यानंतर नाराज मुलाने आपल्या वडिलांच्या डोक्यावर लोखंडाच्या सळईनेवार केले. ज्यामुळे ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्याकेली. त्यानंतर त्याच रात्री या मुलाने आपल्या आईच्या मदतीने मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 

तो मृतदेह घेऊन घरापासून साधारण ५ किमी दूर एका वन क्षेत्रात आला. ओळख नष्ट करण्यासाठी त्याने पेट्रोल आणि टॉयलेट क्लीनरने मृतदेह जाळून टाकला. पोलिसांना ३ मेला अंशत: जळालेला मृतदेह आढळला. तीन आठवड्यांपर्यंत या मृतदेहाची ओळख पटू शकलेली नव्हती. कारण कोणत्याही पोलीस ठाण्यात कोणत्याही व्यक्तीची हरवले असल्याची तक्रार नव्हती. 

पोलिसांना आरोपीवर असा आला संशय

मृत व्यक्तीच्या कुटुंबाने इस्कॉनच्या अधिकाऱ्यांच्या दबावाखाली येऊन २७ मेला एक हरवल्याची तक्रार दाखल केली. कारण मनोज मिश्रा हे इस्कॉनमध्ये डोनेशन कलेक्टर म्हणून काम करत होते. येथील काही सहकाऱ्यांनी मनोज मिश्रा यांच्या मृतदेहाची ओळख पटवली. इस्कॉनमधील त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की मनोज दीर्घकाळापासून अनुपस्थित होते मात्र ते अनेकदा भगवत गीतेचा प्रचार करण्यासाठी यात्रा करत असत त्यामुळे याबाबत कोणताच संशय आला नाही. 

पोलिसांनी जेव्हा मनोजच्या मुलाला चौकशीसाठी बोलावले तेव्हा तो बचावाचा प्रयत्न करू लागला तसेच पोलिसांना परत सवाल करू लागला की ते कोणत्या अधिकाराने त्याची चौकशी करत आहेत. दरम्यान जेव्हा त्याचा मोबाईल चेक केला तेव्हा त्यांना समजले की त्याने क्राईम पेट्रोल ही सीरिज १००हून अधिक वेळा पाहिली. अनेकदा चौकशी केल्यानंतर अखेर त्याने आपली चूक कबूल केली. 

पोलिसांनी या प्रकरणी ३९ वर्षीय आईलाही अटक केली आहे. तिच्यावर हत्या आणि पुरावे नष्ट केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या ११ वर्षीय बहिणीला तिच्या आजी आजोबांकडे सोपवण्यात आले.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी