मुलानेच घेतला वडिलांचा जीव, PUBG खेळण्यास रोखल्याने वडिलांची चाकूने हत्या 

पबजी खेळण्यापासून रोखल्याने पोटच्या मुलानेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

KILLER_SON
मुलानेच घेतला वडिलांचा जीव, PUBG खेळण्यास रोखल्याने वडिलांची चाकूने हत्या 

थोडं पण कामाचं

  • वडिलांनी पबजी खेळण्यापासून रोखल्याने मुलाने वडिलांचे चाकूने हात-पाय कापले
  • आईला दुसऱ्या खोलीत बंद करुन वडिलांचा घेतला जीव 
  • पबजी खेळण्यावरुन मुलगा आणि वडील यांच्यात सतत व्हायचे वाद

बंगळुरु: आई-वडील आपल्या मुलांवर लहानपणापासूनच जीवापाड प्रेम करत असतात. आपल्या मुलांचं पालन-पोषण योग्य पद्धतीनं व्हावं याकडेच त्यांचं कायम लक्ष असतं. त्याच प्रमाणे मुलाने मोठं झाल्यानंतर आपल्या उतारवयात आपला सांभाळ करावा अशी त्यांची माफक इच्छा असते. यामुळे आई-वडील जेवढं शक्य असेल तेवढा चांगला सांभाळ करण्याचा प्रयत्न करतात. पण आजच्या या युगात प्रत्येक मुलाला आई-वडिलांची तेवढी कदर असेलच असं नाही. असं म्हणण्याचं कारण म्हणजे पोटच्याच मुलाने खुद्द आपल्या वडिलांची हत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. 

हे वाचून आपल्याला देखील धक्का बसेल. पण दुर्दैवाने ही घटना खरी आहे. एक अतिशय धक्कादायक घटना आता समोर आली आहे. कर्नाटकमधील बेलगाम शहरात एका मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री एका २५ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांचा खून यासाठी केला की, त्याच्या वडिलांनी त्याला मोबाइलवर पबजी गेम खेळण्यास मनाई केली होती. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी रघुवीर कुंभार हा पबजी गेम खेळण्याच्या आधीन झाला होता. त्यामुळे तो दिवसातील अनेक तास फक्त मोबाइलमध्येच खेळत असायचा. ही गोष्ट त्याचे वडील शंकरप्पा यांना अजिबात आवडत नव्हती. शंकरप्पा हे रघुवीरला यासाठी अनेकदा दटावायचे देखील. पण रघुवीर वडिलांचं ऐकण्याऐवजी नेहमीच त्यांच्यावर नाराज व्हायचा. 

मोबाइलवर सतत गेम खेळत असल्याने वडील सतत मुलाला ओरडत असायचे. यावरुन दोघांमध्ये नेहमीच वाद देखील व्हायचे. रविवारी देखील दोघांमध्ये अशाप्रकारे वाद झाला. त्यावेळी शंकरप्पा यांनी त्याला बरंच दटावलं होतं. यामुळे रघुवीर हा प्रचंड रागात होता. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पहिले आपल्या आईला एका खोलीत बंद केलं आहे आणि त्यानंतर वडिलांचा खून केला. आरोपीने वडिलांना ठार मारल्यानंतर देखील त्यांचे हात-पाय चाकूने कापून टाकले. 

ही घटना रात्री जवळजवळ १२:३० वाजता घडली. मृत शंकरप्पा हे एक निवृत्त पोलीस कर्मचारी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याने आपला गुन्हा देखील मान्य केला आहे. पण असं असलं तरीही पोलीस आता दुसऱ्या मार्गाने देखील या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी