Sonali Phogat: 10वी पास सोनाली फोगाटकडे 50 तोळे सोनं अन् कोट्यवधींची होती संपत्ती, जाणून घ्या कसं मिळत होतं इन्कम

Sonali Phogat assets and income: टिकटॉक स्टार पासून ते राजकीय क्षेत्रात एन्ट्री असा प्रवास असलेल्या सोनाली फोगाट हिचा मृत्यूचं गूढ वाढतच चाललेलं आहे. मात्र, सोनाली यांची संपत्ती किती होती ते माहिती आहे का? वाचा...

sonali phogat property income property education and death mystery read in marathi
Sonali Phogat: 10वी पास सोनाली फोगाटकडे 50 तोळे सोनं अन् कोट्यवधींची होती संपत्ती, जाणून घ्या कसं मिळत होतं इन्कम  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • सोनाली फोगाट यांनी हरियाणातील आदमपूर मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती
  • गोव्यात सोनाली फोगाट यांचा मृत्यू झाला 
  • सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांनी केलेत अनेक गंभीर आरोप

Sonali Phogat death and property details: टिकटॉक स्टार आणि भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांचा गोव्यात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं गूढ दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. मात्र, टिकटॉक स्टार पासून ते राजकीय क्षेत्रात एन्ट्री असा प्रवास असलेल्या सोनाली फोगाट यांची संपत्ती नेमकी किती आहे? त्यांचा इन्कम सोर्स काय होता? हे माहिती आहे का? (sonali phogat property income property education and death mystery read in marathi)

कोट्यवधींची संपत्ती

सोनाली फोगाट यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. 2019 मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्यांनी आदमपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी सोनाली फोगाट यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, एकूण 2,74,11,640 रुपये इतकी त्यांची संपत्ती होती.

हे पण वाचा : वयाच्या 13व्या वर्षी करिना 'याच्या' प्रेमात झाली होती वेडी

50 तोळे सोने 

myneta.info वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सोनाली फोगाट या 10वी पास होत्या. 1995 मध्ये हरियाणात त्यांनी हे शिक्षण घेतलं होतं. त्यांच्याकडे साडे बारा लाख रूपये रोख होते. तर पाच लाख 11 हजार 640 रुपये त्यांच्या बँक (तीन बँक खात्यात) खात्यात होते. यासोबतच त्यांच्याकडे 19 लाख 25 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होते. ज्यामध्ये 50 तोळे सोने होते.

सोनाली फोगाट यांच्याकडे एकूण 6.25 एकर शेतजमीन होती ज्याची किंमत अंदाजे दोन कोटी 15 लाख रुपये इतकी होती. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत अभिनय क्षेत्र, कृषी क्षेत्र आणि इतर मार्ग होते. 2018-19 या आर्थिक वर्षात त्यांनी सादर केलेल्या आयटीआरनुसार, त्यांचं उत्पन्न 5,38,847 रुपये इतके होते.

हे पण वाचा : हॉट दिसण्यासाठी मलायका करते 'हे' देसी उपाय

टिकटॉक स्टार ते अभिनेत्री प्रवास 

टिकटॉक वर व्हिडिओ रील्स बनवत सोनाली फोगाट सोशल मीडियात खूपच प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर त्यांना रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसमध्ये सुद्धा सहभागी होण्याची संधी मिळाली. इतकेच नाही तर त्यांनी मॉडलिंग आणि अभिनय क्षेत्रातही काम केलं आहे. हरियाणवी सिनेमा 'छोरियां छोरों से कम नहीं होतीं...' मध्ये सोनाली होत्या. दूरदर्शनवर अँकरिंगसोबत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

मृत्यूचं गूढ 

22 ऑगस्ट रोजी सोनाली फोगाट यांचा गोव्यात मृत्यू झाला. त्या 42 वर्षांच्या होत्या. ह्रदयविकाराच्या झटका त्यांना आला होता. मात्र, त्यांच्या मृत्यूचं गूढ वाढत चाललं आहे. कारण, त्यांना जबरदस्तीने ड्रग्ज दिल्याचा आरोप केला जात आहे. तसेच सोनाली फोगाट यांच्या कुटुंबीयांनीही काही गंभीर आरोप केले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी