Sonia Gandhi and Priyanka Gandhi Vadra Corona positive : नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा या दोघी कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे होम क्वारंटाइन झाल्या आहेत. मागील काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी अशा स्वरुपाचे आवाहन दोघींनी केले आहे.
ईडीने (Enforcement Directorate - ED / सक्तवसुली संचालनालय / अंमलबजावणी संचालनालय) नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांना समन्स बजावले. पण राहुल गांधी परदेशी असल्यामुळे सध्या चौकशीसाठी उपलब्ध नाहीत. नोटीस मिळाल्यानंतर सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे काँग्रेस पक्षाकडून रणदीप सूरजेवाला यांनी जाहीर केले. सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे जाहीर करून २४ तास उलटण्याच्या आधीच प्रियांका यांनाही कोरोना झाला. प्रियांका गांधी वाड्रा यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा या दोघींना सौम्य स्वरुपाचा कोरोना झाला आहे.