Sonia Gandhi Covid Positive: सोनिया गांधी कोरोना पॉझिटीव्ह; रणदीप सुरजेवाला यांनी दिली माहिती

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 02, 2022 | 13:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sonia Gandhi Covid Positive । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.

Sonia Gandhi Corona Positive, Information provided by Randeep Surjewala
कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी कोरोना पॉझिटीव्ह  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोनिया गांधी या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.
  • रणदीप सुरजेवाला यांनी दिली माहिती.
  • सोनिया गांधी ८ जून रोजी ईडीसमोर हजर होतील - सुरजेवाला.

Sonia Gandhi Covid Positive । नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. प्रियांका गांधीही त्यांच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे त्या लखनऊहून दिल्लीला परतल्या आहेत. मात्र अद्याप त्यांची चाचणी झालेली नाही. (Sonia Gandhi Corona Positive, Information provided by Randeep Surjewala). 

अधिक वाचा : या ४ लोकांनी चुकूनही पिऊ नये ऊसाचा रस, वाचा सविस्तर

सोनिया गांधीना कोरोनाची सौम्य लक्षणे 

मागील काही दिवसांमध्ये सोनिया गांधी यांनी पक्षातील अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. यातील काही नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. सोनिया गांधींना सौम्य तापाची लक्षणे दिसू लागली होती, त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर सोनिया यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांनी स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे आणि सर्वांना खबरदारी घेण्यास सांगितले जात आहे. प्रियांका गांधी यांनी देखील सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, त्यानंतर खबरदारी म्हणून त्या लखनऊहून दिल्लीला परतत आहेत.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सोनिया गांधींबद्दल सांगितले की, सोनिया गांधींवर उपचार सुरू आहेत, सध्या त्या ठीक आहेत. त्यांनी सांगितले की, सोनिया गांधींनी मला सांगितले आहे की त्या ८ जून रोजी ईडीसमोर हजर होतील. सोनिया गांधी यांनी कोविड चाचणी केली होती, ज्यामध्ये त्या कोविड पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. पुढील तीन ते चार दिवसांनी सोनिया गांधी यांची पुन्हा चाचणी होईल.

ईडीकडून राहुल, सोनिया गांधीना समन्स

सक्तवसुली संचालनालयाने (ED) नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald Case) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना बुधवारी समन्स (Summon) बजावले आहे. लक्षणीय बाब म्हणजे ईडीने या प्रकरणाचा तपास २०१५ साली बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा जुन्या फाईल्स उघडण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी