[VIDEO] पंतप्रधान मोदींच्या संबोधनाआधी सोनिया गांधीनी देशाला दिला 'हा' संदेश

पंतप्रधान मोदी हे आज देशाला संबोधणार आहेत. मात्र, त्याच्या आधी सोनिया गांधी यांनी देशाला एक संदेश दिला आहे. पाहा नेमकं काय म्हणाल्या आहेत सोनिया गांधी.

sonia gandhi delivered a message to the nation ahead of pm modi's address
पंतप्रधान मोदींच्या संबोधनाआधी सोनिया गांधीनी देशाला दिला 'हा' संदेश  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज (१४ एप्रिल २०२०) सकाळी दहा वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. मात्र, त्याआधी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशाला एक संदेश दिला आहे. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून देशाला आपला संदेश दिला आहे. कोरोनाच्या संकटाशी लढत असणाऱ्या सर्वांचं सोनिया गांधी यांनी आभार मानले आहेत. तसंच यावेळी त्यांनी त्यांचं प्रोत्साहन देखील वाढवलं आहे.

त्या असं म्हणतात की, 'कोरोना संकटात डॉक्टर, सफाई कर्मचारी, पोलिसांसह सरकारी अधिकाऱ्यांची असणारी चिकाटी यासारखी दुसरी देशभक्ती नाही. आपण  ऐक्य, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनाला नक्कीच पराभूत करु. धैर्य आणि संयम यासाठी देशवासियांचे आभार.' 

सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, 'वैयक्तिक सुरक्षा नसतानाही आम्ही ही लढाई जिंकण्यासाठी दिवसरात्र एकत्र आहोत. आमचे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक संस्था वैयक्तिक संरक्षक उपकरणाच्या अभावी देखील रुग्णांवर उपचार करत आहेत.' 

दुसरीकडे, कोरोना विषाणूचे संकट आणि कठीण परिस्थिती लक्षात घेऊन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थ्यांना सप्टेंबरपर्यंत प्रति व्यक्ती १० किलो धान्य (मासिक) देण्याची विनंती केली आहे. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्या लोकांनाही हा दिलासा मिळाला पाहिजे. 

सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र 

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात सोनिया गांधी यांनी असेही म्हटले आहे की, 'कोरोना विषाणूविरूद्ध लढाईच्या या घटनेत कोणत्याही नागरिकाला उपासमारीच्या संकटाचा सामना करावा लागू नये याची काळजी सरकारला घ्यावी लागेल. लॉकडाऊन दरम्यान लोकांना गंभीर अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे. हे खूप वाईट आहे कारण देशात प्रचंड धान्य साठा आहे.'

कॉंग्रेस अध्यक्ष पुढे असंही म्हणतात की, 'अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभार्थ्यांनी प्रत्येक व्यक्तीला १० किलो धान्य (दरमहा) तीन महिन्यांसाठी आणि (सप्टेंबरपर्यंत) वाढवावे.' सध्याची परिस्थिती लक्षात घेता लोकांना अन्नधान्य मोफत द्यावे, असंही त्या म्हणाल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी