National Herald Case : नॅशनल हेराल्ड खरेदीप्रकऱणाची (National Herald Case) फाईल ईडीकडून (ED) पुन्हा उघडण्यात आली असून मंगळवारी या प्रकऱणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची (Sonia Gandhi) चौकशी (Inquiry) होणार आहे. या दिवशी देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलनाची (Peaceful agitation) हाक देण्यात आली आहे. 26 जुलै रोजी देशभरातील कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन करावं, अशी सूचना पक्षाच्या वतीने देशभरातील कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.
Congress Party has asked all state units to organise a peaceful 'Satyagraha' on July 26, when Congress interim President Sonia Gandhi will appear before ED — ANI (@ANI) July 24, 2022
All MPs, AICC General Secy & CWC members have been asked to participate in Satyagraha to be organised in Delhi: Congress pic.twitter.com/vZRoldOU23
26 जुलै रोजी सोनिया गांधी या नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणार आहेत. या दिवशी दिल्लीत काँग्रेसच्या सर्व खासदारांना, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी सदस्यांना आणि काँग्रेस कार्यकारिणी सदस्यांनाही हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रातील मोदी सरकारविरोधात वातावरण तयार करण्यासाठी काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जाणार आहे.
गेल्या महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची याच प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी सोनिया गांधी यांना कोरोना झाल्यामुळे त्यांनी चौकशीला सामोरे जाण्यासाठी अधिकची वेळ मागून घेतली होती. त्यानुसार त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर सोनिया गांधींची तब्येत अधिकच बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करावं लागलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा चौकशीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता 26 जुलै रोजी त्यांनी चौकशी होणार आहे.
अधिक वाचा - CISCE ISC 12th Result 2022: सीआयएससीई बोर्डाच्या १२वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ठाण्यातील उपासना नंदी प्रथम
नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी संलग्न असणारे हे वृत्तपत्र 2008 सालापर्यंत काँग्रेसशी संलग्न होते. 1 एप्रिल 2008 साली हे वृत्तपत्र तात्पुरते बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. 2009 मध्ये हे वृत्तपत्र कायमचे बंद करण्यात येत असल्याची घोषणा काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधींनी केली
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक फेरफार झाल्याची तक्रार केली होती. या वृत्तपत्राची मालकी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) या संस्थेकडे होती. या संस्थेकडून यंग इंडिया लिमिटेड या संस्थेने वृत्तपत्राचा ताबा घेतला. या संस्थेत सोनिया गांधी व राहुल गांधी यांची प्रत्येकी 38 टक्के मालकी आहे. या व्यवहार 90 कोटी रुपयांना झाला. वास्तविक, हजारो कोटींची मालमत्ता असलेल्या या वृतपत्राचा व्यवहार केवळ 90 कोटीत झाल्याला आक्षेप घेत सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
अधिक वाचा - Breaking News 24 July 2022 Latest Update: उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित
ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनं नॅशनल हेराल्डची मालकी असणाऱ्या एजेएल संस्थेला 90 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. त्यानंतर मालकी हस्तांतरित करताना यंग इंडिया लिमिटेड या कंपनीच्या नावे त्यातील 50 लाख रुपये कर्ज हस्तांतरित करण्यात आलं. कर चुकवण्यासाठी हा आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता.