गांगुलीने घेतली पश्चिम बंगालच्या राज्यपालांची भेट

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत सुमारे एक तास चर्चा झाली.

Sourav Ganguly Meets Bengal Governor Jagdeep Dhankhar
गांगुलीने घेतली पश्चिम बंगालच्या राज्यपालांची भेट 

थोडं पण कामाचं

  • गांगुलीने घेतली पश्चिम बंगालच्या राज्यपालांची भेट
  • पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे २०२१ दरम्यान विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता
  • 'बंगाल की माटी का' मुख्यमंत्री देणार, अमित शहांची पश्चिम बंगालमध्ये घोषणा

कोलकाता: बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत सुमारे एक तास चर्चा झाली. गांगुली यांनी दिलेले आमंत्रण स्वीकारत राज्यपालांनी लवकरच कोलकाता येथील इडन गार्डन स्टेडियमला भेट देणार असल्याचे जाहीर केले. इडन गार्डन हे १८६४ पासून अस्तित्वात असलेले मैदान आहे. अतिशय जुने मैदान असल्यामुळे इडन गार्डनला विशेष महत्त्व आहे. (Sourav Ganguly Meets Bengal Governor Jagdeep Dhankhar)

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे २०२१ दरम्यान विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता

गांगुली यांच्याकडून राज्यपालांची सदिच्छा भेट घेतल्याचे जाहीर करण्यात आले तरी या भेटीमागील राजकारणावर चर्चा सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे २०२१ दरम्यान विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. काही आठवड्यांपूर्वी निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व पक्षांच्या प्रतिनिधींशी निवडणूक नियोजनाबाबत प्राथमिक चर्चा केली होती. या चर्चेनंतर राज्यातील राजकीय वाऱ्यांचा वेग वाढला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप हा राजकीय संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. पक्षांतर, राजकीय आरोप-प्रत्यारोप यांनी पश्चिम बंगालचे वातावरण ढवळून निघत आहे. या वातावरणात सौरव गांगुली यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांची सदिच्छा भेट घेतली. गांगुली आणि राज्यपाल यांच्या भेटीत सुमारे एक तास चर्चा झाली.

'बंगाल की माटी का' मुख्यमंत्री देणार, अमित शहांची पश्चिम बंगालमध्ये घोषणा

राज्यपालांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन गांगुली सोबतचे राज्यपालांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आल्यामुळे या भेटीची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी राज्याला 'बंगाल की माटी का' मुख्यमंत्री देणार असल्याचे जाहीर केले. यामुळे भाजप एखाद्या स्थानिक नेत्याला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करणार अशी शक्यता व्यक्त होत होती. तर्कवितर्क सुरू असतानाच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांची सदिच्छा भेट घेतली. 

आयसीसीमध्ये गांगुली-शहा जोडी भारताचा चेहरा म्हणून काम करणार

याआधी बीसीसीआयची ८९वी सर्वसाधारण सभा गुजरातमध्ये अहमदाबाद येथे पार पडली. सर्वसाधारण सभेत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सरचिटणीस जय अमित शहा या दोघांनी आयसीसीचे संचालक आणि भारताचे प्रतिनिधी म्हणून काम करावे असे ठरले. आयसीसीमध्ये गांगुली-शहा जोडीने भारताचा चेहरा म्हणून काम करावे असे सर्वसाधारण सभेत ठरवण्यात आले. जय शहा हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव आहेत. विशेष म्हणजे गांगुली आणि अमित शहा यांची काही महिन्यांपूर्वी भेट झाली होती. ही सदीच्छा भेट असल्याचे दोघांकडून सांगण्यात आले पण या भेटीतील चर्चेविषयी अधिकृतरित्या जास्त माहिती देणे टाळण्यात आले होते. या सगळ्या घडामोडींचा एकमेकांशी संदर्भ जोडला जात आहे. सौरव गांगुली भविष्यात भाजपकडून राजकारणात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी