दक्षिण भारतात 26 दिवस धो-धो पाऊस, रेड अलर्ट जारी; नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण भारतभरात 143% जास्त पाऊस

Red Alert issued To South India :दक्षिण भारतात पावसाचा कहर सुरूच असून बहुतेक भागांमध्ये पूर (Flood) आला आहे.  पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार (Indian Meteorological Department), 1 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान या दक्षिण भारतात 63 % अतिरिक्त पाऊस झाला आहे.

South India receives 26 days of rain, red alert issued
दक्षिण भारतात 26 दिवस धो-धो पाऊस, रेड अलर्ट जारी  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • 1 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण भारतभरात 143.4% अधिक पावसाची नोंद
  • यंदा दक्षिण भारतात हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये पाऊस.
  • तामिळनाडू, पुडुचेरी, केरळसाठी विशेष पूर सूचना जारी करण्यात आली आहे.

Red Alert issued To South India : चेन्नईः दक्षिण भारतात पावसाचा कहर सुरूच असून बहुतेक भागांमध्ये पूर (Flood) आला आहे.  पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार (Indian Meteorological Department), 1 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान या दक्षिण भारतात 63 % अतिरिक्त पाऊस झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात दक्षिण भारताला अनेक वेळा मुसळधार पावसाचा (Heavy rain) सामना करावा लागला आहे. तर याच काळात म्हणजेच, 1 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण भारतभरात 143.4% अधिक पावसाची नोंद झाली आहे. 

भारतीय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून तामिळनाडू, पुडुचेरी, केरळसाठी विशेष पूर सूचना जारी करण्यात आली आहे, आणि रेड अलर्ट जारी केला आहे. 1 ऑक्टोबरपासून ईशान्य मान्सून सिजन दरम्यान तामिळनाडूमध्ये 61 टक्के, पुद्दुचेरीमध्ये 83, कर्नाटकात 105 आणि केरळमध्ये 110 टक्के अधिक पाऊस झाला आहे. या महिन्यात पावसामुळे चेन्नई आणि आंध्र प्रदेशातील सीमाभागांना भीषण पुरांना सामोरे जावे लागले. एकूणच, दक्षिण भारतातील सामान्य जनजीवन अनेक दिवसांपासून विस्कळीत झाले आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गुरुवार आणि शुक्रवारी तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये 24 नोव्हेंबरपर्यंत 3523.3 मिमी पाऊस पडला आहे. हा पाऊस 2018 च्या तुलनेत थोडा जास्त आहे. यंदा दक्षिण भारतात हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये पाऊस झाला आहे. जानेवारी, मार्च, एप्रिल, मे, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या सात महिन्यांत जास्त पाऊस झाला आहे.

गेल्या आठवड्यात, पुरामुळे तिरुमला, तिरुपतीमध्ये शेकडो यात्रेकरू अडकले होते. पुरामुळे मूर्ती पाण्याखाली गेल्याने मंदिर परिसरात भीषण स्थिती तयार झाली होती. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. विमान आणि रेल्वे सेवा प्रभावित झाली.  सक्रिय ईशान्य मान्सूनमुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये वारंवार पाऊस पडत आहे, असे IMD चे महासंचालक एम महापात्रा म्हणाले. या महिन्यात जवळजवळ प्रत्येक आठवड्यात बंगालच्या उपसागरावर सतत कमी दाबाचे क्षेत्र, चक्रीवादळ तयार होत आहे. 29 नोव्हेंबर रोजी अंदमान समुद्रावर आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी