madarsa education: मदरसांमध्ये गोडसे, प्रज्ञा सिंह तयार होत नाहीत : आझम खान

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 12, 2019 | 20:24 IST | टाइम्स नाऊ हिंदी

madarsa education: मदरसांमधून नथुराम गोडसे आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारख्या व्यक्ती बाहेर पडत नाही, असे वक्तव्य आझम खान यांनी केले आहे. मदरसांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची योजनेवर खान यांनी केले.

azam khan
मदरसांमध्ये गोडसे, प्रज्ञा सिंह तयार होत नाहीत : आझम खान   |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्ली : मदरसांमध्ये देण्यात येणाऱ्या शिक्षणावरून एक नवा वाद उफाळून आला आहे. सातत्याने वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी या वादाला फोडणी दिली आहे. मदरसांमधून नथुराम गोडसे आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारख्या व्यक्ती बाहेर पडत नाही, असे वक्तव्य आझम खान यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदरसांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची योजना आणली आहे. केंद्रीय अल्पसंख्याक विकास खात्याचे मंत्री असलेल्या मुख्तार अब्बास नक्वी यांनी देशभरातील मदरसांना औपचारिक आणि मुख्य प्रवाहातील शिक्षणाशी जोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आझम खान यांचे वक्तव्य समोर आले आहे. आता यावरून वाद-प्रतिवाद सुरू झाले आहेत. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर सध्या भोपाळमधून भाजपच्या तिकिटावर खासदार झाल्या आहेत. निवडणुकीदरम्यान त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याला देशभक्त म्हटले होते. पक्षाकडून या संदर्भात सूचना आल्यानंतर त्यांनी आपले विधान मागे घेतले होते.

आझम खान नेमके काय म्हणाले?

आझम खान यांनी म्हटले आहे की, आमच्या मदरसांमध्ये नथुरामसारखी वृत्ती जन्माला येत नाही. प्रज्ञा ठाकूरसारखी व्यक्ती आम्ही तयार करत नाही. पहिलं यांना थांबवा नथुराम गोडसेचे गुणगान करणाऱ्यांना लोकशाहीचे शत्रू घोषित करा. ज्यांना दहशतवादी कारवायांसाठी शिक्षा झाली आहे त्यांना सन्मान दिला जाणार नसल्याचे जाहीर करा. मदरसांमध्ये धर्माचे शिक्षण दिले जाते. बहुतांश मदरसांमध्ये इंग्रजी, हिंदी आणि गणित शिकवले जाते. हे आधीपासूनच सुरू आहे. तुम्हाला जर मदतच करायची असेल तर, त्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी करा. मदरसांसाठी भवन उभारा. तेथे माध्यान्य आहाराची व्यवस्था करा.’


जमीयत उलेमा-ए-हिंद म्हणते, ‘स्वागत आहे’

देशभरात मदरसांची संख्या मोठी असल्याचे सांगून केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, ‘मदरसांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणल्यास तेथून बाहेर पडणारी मुले समाजाच्या विकासात बरोबरीने पुढे येतील. अल्पसंख्याक समाजातील विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सशक्तीकरण करण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. त्यासाठी शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर येत्या पाच वर्षांत पाच कोटी रुपयांच्या शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहेत.’ सरकारच्या या निर्णयानंतर जमीयत उलेमा-ए-हिंद या संस्थेचे महासचिव मौलाना महमूद मदनी म्हणाले, ‘देशात समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांना समान संधी मिळायला हवी. आम्ही अशा प्रकारच्या कोणत्याही निर्णयाचे स्वागतच करू.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
madarsa education: मदरसांमध्ये गोडसे, प्रज्ञा सिंह तयार होत नाहीत : आझम खान Description: madarsa education: मदरसांमधून नथुराम गोडसे आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारख्या व्यक्ती बाहेर पडत नाही, असे वक्तव्य आझम खान यांनी केले आहे. मदरसांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची योजनेवर खान यांनी केले.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles